मेथीचे लाडू

साहित्य : ५० ग्रॅम मेथी पावडर. १ वाटी मोठी गाईचे साजूक तूप, १ वाटी भरून किसलेला गूळ (गोड जास्त पाहीजे असल्यास सव्वा वाटी ते दिड वाटी गूळ घ्यावा. अर्धी वाटी किसलेले खोबरे, पाव चाटी खसखस, अर्धी वाटी, खारकेची पूड, पाव वाटी बदाम पूड, १ वाटी भरुन कणीक, ५० पॉम डिंक, १ चमचा जायफळ पूड

कृती : मेथी पावडर ४ ते ५ दिवस तुपात भिजत ठेवावी. पाच दिवसानंतर खोबरे, खसखस भाजून पूड करावी. कणीक अगदी बेसनासारखी भाजून घ्यावी. डिंक तळून कुस्करुन मेथी पावडरमध्ये मिक्स करावे. खोबरे, खसखस, कणीक, खारीक पावडर, बदाम पावडर, जायफळ पूड सर्व एकत्र करावे. गूळ किसून घालावा, सर्व कोमट असतानाच लाडू वळावेत.

- पुष्पाताई शिलोत्री

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– पुष्पाताई शिलोत्री

Author