त्रिवेणी लाडू

साहित्य: ३ वाट्या रवा, दीड वाटी बेसन, २५० ग्रॉम खवा, २ कप केशर मिश्रीत दूध पाणी, ३ वाट्या साखर, पिस्त्यांची भरड, १ टीस्पून वेलची पूड, सजावटीसाठी चेरी व चांदीचा वर्ख

कृती: प्रथम तूपात रवा, गुलाबीसर भाजावा. रवा, गुलाबी झाला की त्यात १ कप उकळते केशर मिश्रीत दूध पाणी घालावे. गॅस बंद करुन रवा परतावावा मोकळा झाल्यावर ताटात काढून घ्यावा. बेसन भर तूपात भाजून घ्यावे. बदामी झाले की रव्याबरोबर ताटात काढावे. त्याच पातेलीत खवा भाजून काढून ठेवावा.

पातेलीत साखर घालून ती भिजेल इतकेच केशर मिश्रीत दूध पाणी घालावे. त्याचा पाक करावा. पाक सतत हालवत रहावा व एकतारी झाला की त्यात खवा घालून हलवावे. गॅस बंद करुन त्यात वेलचीची पूड घालावी. साधारण ३-४ तासांनी किंवा सुकत आल्यावर त्याचे लाडू वळावेत. पिस्त्याच्या चुऱ्यात घोळवून वर्ख लावून चेरीने सजवावे.

सौ. संगीता राजीव गुप्ते

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

Author