शाही चुरमा लाडू

साहित्य: २वाट्या बारीक रवा, ४ टेबलस्पून तूप, दिड वाटी पिठीसाखर, १० - १२ बदाम, १०-१२ काजू,१०-१२ वेलची, चार टी.स्पून, चारोळ्या, थोडे दूध व चवीपुरते मीठ, मुटके तळण्यासाठी तूप

कृती: प्रथम रवा एक टेबलस्पून तूप व चवीपुरते मीठ घालून रवा रवाळ करुन दूध व थोडे पाणी घालून घट्ट भिजविणे. नंतर १० मिनिटांनी त्याचे लहान गोळे मुटके घट्ट करून मंद गॅसवर लालसर तळून घेणे, मुटके गरम असताना मिक्सर मधून बारीक करुन घ्यावेत. नंतर चाळून घ्यावे. ताटात तूप घेऊन त्यात पिठीसाखर टाकून चांगले फेसून घेऊन वरील मिश्रण व काजू, बदाम, चारोळी व वेलची यांची पावडर वरील मिश्रणात घालावी. नंतर लाडू वळावेत.लाडू वळताना लाडवाला बेदाणा अगर चेरी लावावी.

- सौ. सुलभा मो. देशपांडे

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

साहित्य: २वाट्या बारीक रवा, ४ टेबलस्पून तूप, दिड वाटी पिठीसाखर, १० – १२ बदाम, १०-१२ काजू,१०-१२ वेलची, चार टी.स्पून, चारोळ्या, थोडे दूध व चवीपुरते मीठ, मुटके तळण्यासाठी तूप

कृती: प्रथम रवा एक टेबलस्पून तूप व चवीपुरते मीठ घालून रवा रवाळ करुन दूध व थोडे पाणी घालून घट्ट भिजविणे. नंतर १० मिनिटांनी त्याचे लहान गोळे मुटके घट्ट करून मंद गॅसवर लालसर तळून घेणे, मुटके गरम असताना मिक्सर मधून बारीक करुन घ्यावेत. नंतर चाळून घ्यावे. ताटात तूप घेऊन त्यात पिठीसाखर टाकून चांगले फेसून घेऊन वरील मिश्रण व काजू, बदाम, चारोळी व वेलची यांची पावडर वरील मिश्रणात घालावी. नंतर लाडू वळावेत.लाडू वळताना लाडवाला बेदाणा अगर चेरी लावावी.

– सौ. सुलभा मो. देशपांडे

Author