मँडरीन सूप

साहित्य: वेळ: :२५ मिनिटे पाऊण कप शिजवलेल्या चिकनचे लांबट तुकडे, पाव कप सेलरीची चिरलेली देठे, ५ कप चिकन स्टॉक, २ कप पाणी, ३ बटणं मशरूम.
१ गाजर- सोलून उभे, लांबट, पातळ चिरलेले, ६ पाने पालकाची बारीक चिरलेली, १ अंडे.
१ टे. स्पून कॉर्नफ्लोअर, पाव टी स्पून आजिनोमोटो, पाव टी स्पून मीठ व तेवढीच मिरेपूड, १ टे. स्पून रिफाईंड तेल.

कृती: मशरूम स्वच्छ धुवून उभे चिरावे. चिकन स्टॉक उकळत ठेवावा. त्यात सेलरी, गाजर, पालक व मशरूम हे सर्व घालावे. पाणीही घालावे. पाच मिनिटे उकळवावे. मोठ्या पातेल्यात तेल घालून शिजवलेल्या चिकनचे तुकडे टाकून परतावे. जरा तांबूस झाल्यावर हे तुकडे उकळत्या सूपमध्ये घालावेत. मीठ, मिरपूड, अजिनोमोटो घालावे. चव पाहून आवडीप्रमाणे मीठ, मिरपूड वाढवावी. कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून उकळत्या सूपमध्ये घालावे. चांगली उकळी आणावी. अंडे फेसून सूपावर धार धरत ढवळावे नंतर गॅस बंद करावा.

Author