साहित्य: ६-७ छोट्या आकाराचे बटाटे, २ कांदे सोलून गोल पातळ काप करावे, १ कप चिकन स्टॉक + १ कप पाणी, पाव टी स्पून किसलेले आले, १ टे. स्पून लोणी, मीठ, मिरेपूड, थोडी जायफळपूड चवीप्रमाणे.
कृती: वेळ २० मिनिटे कच्चे बटाटे सोलून त्याचे गोल जरा जाडसर काप करावेत. प्रेशर पॅनमध्ये लोणी घालून लोणी वितळेपर्यंत गरम करावे व गॅस बंद करावा. बटाट्याच्या कापांचा थर लावावा. त्यावर कांद्याच्या चकत्यांचा थर लावावा. असे थर लावून पूर्ण झाले की त्यावर अलगद चिकन स्टॉक व पाणी घालावे. मीठ, मिरेपूड व जायफळ, किसलेले आले घालावे. मंद गॅसवर कुकरच्या दोन शिट्या घ्याव्यात. कुकर थंड झाल्यावर उघडावा व सूपावर लोणी घालावे. बटाट्याच्या व कांद्याच्या चकत्यांसह हे सूप उथळ बाऊलमध्ये वाढावे. बाऊलमध्ये देताना वेळेवर भाजलेल्या पापडाचा चुरा पेरावा.