साहित्य: ८-१० मध्यम आकाराचे कांदे, ३ टी स्पून लोणी किंवा तूप, वेळ २५ मिनिटे ३ टी स्पून कॉर्नफ्लोअर, ४ कप दूध, टोस्टचे तुकडे, २ अंड्यातला पिवळा बलक, मीठ व मिरेपूड (चवीपुरते )
कृती: कांद्याचे उभे पातळ काप करावे. लोणी किंवा तुपावर गुलाबी रंग येईपर्यंत परतावे. त्यावर कॉर्नफ्लोअर व दुधाची पेस्ट करून घालावी. सारखे ढवळत राहावे. मीठ, मिरेपूड घालावी. आवश्यक तेवढे पाणी घालावे. अंड्यातले पिवळा बलक खूप फेटावा व एक कप दुधात मिसळून पुन्हा फेसून ठेवावा. सूप उकळत ठेवावे त्यात उरलेले दूध घालून उकळी येऊ द्यावी. गॅस बंद करून फेसलेले अंडे घालावे. अंड्याचे मिश्रण घातल्यावर पुन्हा सूप गरम करू नये. बाऊलमध्ये टोस्टचे तुकडे घालून त्यावर गरम सूप घालावे. त्यावर कोथिंबिरीची पाने न चिरता पसरवावी.