पालेभाज्यांचे सूप

साहित्य: एक मोठा बटाटा सोलून फोडी करा, ३ मोठे टोमॅटो, वेळ: ४० मिनिटे ३ कांदे, अर्धी जुडी पालक, अर्धी जुडी लाल माठ, २ टे. स्पून लोणी, ३ पाकळ्या लसूण, तळलेले ब्रेडचे चौकोनी तुकडे, मीठ-मिरेपूड चवीपुरते.

कृती: सर्व पालेभाज्या आणि कांदे-बटाटे-टोमॅटो चिरून चार कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावे. गार झाल्यावर मिक्सरमधून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण एका मोठ्या पातेल्यात ओतावे व थोडे उकळवावे. जाड वाटल्यास आणखी पाणी घालावे. हे मिश्रण गाळू नये. हे सूप उकळल्यावर मीठ-मिरेपूड घालावे. लोणी गरम करून त्यात लसूण ठेचून त्याची फोडणी करावी व ती सुपावर ओतावी. बाऊलमध्ये तळलेले ब्रेडचे तुकडे घालून गरम सूप वाढावे.

Author