व्हेज व्हरायटी सूप

साहित्य: २ मोठे लाल टोमॅटो, १ मोठा कांदा, १ मोठे गाजर, १ वाटी किसलेला लाल भोपळा, अर्धी वाटी किसलेला दुधी भोपळा, ४ देठे सेलरी, २ टी स्पून कॉर्नफ्लोअर, १ टे. स्पून अमूलबटर, १ कप दूध, मीठ-मिरेपूड चवीप्रमाणे.

कृती: -वेळ: २५ मिनिटे टोमॅटो, गाजर, लाल-भोपळ्याचा व दुधी भोपळ्याचा कीस सर्व एकत्र करून प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून शिजवावे. भाज्या शिजल्यावर गाळून घ्याव्यात. पाणी व वरच्या भाज्या वेगवेगळ्या ठेवाव्यात. गाळून वर राहिलेल्या भाज्या मिक्सरमधून काढाव्यात.
एक कप दूध, अर्धा कप पाणी उकळत ठेवावे. अर्धा कप पाण्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करुन उकळत्या दूध-पाण्यात हळूहळू ओतून ढवळत राहावे. नंतर गॅस बंद करावा. कांदा बारीक चिरावा. सेलरीच्या काड्या बारीक चिरून वेगवेगळे ठेवावे. पातेल्यात अमूल बटर गरम करून चिरलेला कांदा त्यावर घालावा. कांदा तांबूस झाल्यावर चिरलेली सेलरी घालून जरा परतावी.

उकळी आल्यावर मिक्सरमधून काढलेले भाज्यांचे एकजीव मिश्रण घालावे. जरा ढवळून कॉर्नफ्लोअर मिश्रण त्यात घालावे. चांगले उकळवावे. जाड वाटल्यास थोडे पाणी घालावे. मीठ, मिरेपूड घालावी. गरम सूप बाऊलमध्ये द्यावे. आवडत असल्यास वरून थोडे थोडे क्रीम घालावे.

Author