साहित्य: ४-५ गाजरे.
१ लहान कांदा, ३ टे.स्पून तांदूळ, ५-६ कप पाणी, १ टे. स्पून बटर, वेळ: २० मिनिटे २ स्लाईस ब्रेडचे तुकडे चौकोनी करून तुपात तळलेले, मीठ, साखर चवीपुरते.
कृती: गाजर सोलून पातळ चिरून घ्यावे. कांदा बारीक चिरावा. थोडे बटर पातेल्यात घेऊन त्यावर कांदा व गाजर परतावे. त्यातच तांदूळ घालून पाणी ओतावे. साखर, मीठ घालून झाकण ठेवावे. सर्व नीट शिजवावे. गार झाल्यावर त्यातील थोड्या गाजराच्या चकत्या काढून ठेवाव्यात. नंतर सर्व मिक्सरवर फिरवून एकजीव करून घ्यावे आणि मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण गॅसवर ठेऊन एक उकळी आणावी. हे गरम सूप वाढताना त्यावर उरलेले बटर घालावे आणि वरून तळलेले ब्रेडचे तुकडे व गाजराच्या चकत्या घालाव्यात.