साहित्य: ७-८ गाजरे सोलून पातळ काप करून, २ कांदे सोलून त्याचे पातळ काप, ३ कप पाणी, १ टे. स्पून मैदा, १ टे. स्पून लोणी, १ कांदा बारीक चिरलेला, दीड कप दूध, १ तमालपत्र, मीठ, मिरेपूड चवीपुरती.
कृती: वेळ: २० मिनिटे एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात गाजराचे व कांद्याचे काप घालावेत. गाजर शिजल्यावर गाजराचे थोडेसे काप शोभेसाठी बाहेर काढून ठेवावेत. नंतर उरलेले गाजर- कांद्याचे मिश्रण, दूध, मैदा मिक्सरमधून एकजीव करून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात लोणी गरम करून त्यात तमालपत्र टाकावे आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. जरा परतून त्यावर मिक्सरमधील मिश्रण घालावे. मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून जरा हलवून हे पाणी वरील मिश्रणात घालावे. चांगले उकळल्यावर मीठ व मीरेपूड घालावी. नंतर चव घेऊन पाहावे. सूप थोडे दाटसर असावे. बाऊलमध्ये गरम सूप वाढताना काढून ठेवलेले गाजराचे काप घालावेत.