मटार पुदीना सूप

साहित्य: अर्धा किलो सोललेले मटाराचे दाणे, २ पातीचे कांदे बारीक चिरलेले, १ लहान कांदा बारीक चिरलेला, १ कप देठासहित पुदिन्याचे गुच्छ, १ टे. स्पून लोणी, ४-५ कप व्हेज स्टॉक, अर्धा कप क्रीम किंवा दूध, पाव टी स्पून किसलेले आले, मीठ-मिरेपूड.

कृती: वेळ: ३० मिनिटे लोणी गरम करून त्यावर कांदा व पातीचा कांदा परतावा. त्यात मैदा घालून पुन्हा परतावे. पुदिन्याचे गुच्छ घालून ढवळावे. मग स्टॉक घालून उकळत ठेवावे. त्यात वाटाणे घालून शिजेपर्यंत उकळवावे. वाटाणा शिजला की गॅस बंद करावा व मिश्रण गार करत ठेवावे. त्यातून पुदिन्याचे गुच्छ काढून टाकावेत. नंतर वरील सर्व मिश्रण मिक्सरमधून एकजीव करावे व दुसऱ्या भांड्यात उकळत ठेवावे. जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे. मीठ-मिरपूड, आले घालावे. पुन्हा उकळवावे व क्रीम घालावे. हे सूप गरम किंवा अगदी थंड दोन्ही प्रकारे छान लागते. गरम सूप वाढताना क्रीमचा थेंब घालावा व त्यावर दोन पुदिन्याची पाने शोभेसाठी लावावीत.

Author