बघ उघडूनी दार अंतरी, उभा कटीवर हात,
माझ्या श्वासांच्या तालावर, विठ्ठल धरितो नाद।
ना पंढरीची वाट इथे, ना चंद्रभागेचा घाट,
हृदयाच्या त्या वाळवंटी, उमलतो भक्तीचा थाट॥१॥
डोळे मिटता सावळा तो, तेजोमय भासे,
अश्रूंच्या त्या ओवाळीने, चरणी मन हे वसे।
नाही मागणे काही आता, नाही इच्छा ठायी,
तुझ्या नामाच्या गजरात, देहभान हरपून जाई॥२॥
अहंकाराची वीट काढुनी, रचिले अंत:करण,
त्या भक्तीच्या रांगोळीत, उमटले तुझे चरण।
लोभ-मोहाची धूळ झटकुनी, स्वच्छ केले द्वार,
ये रे माझ्या अंतरी आता, पांडुरंगा आधार॥३॥
वादळ येवो दुःखांचे, काळोख दाटो भोवती,
नाम तुझे दीप बनूनी, उजळे माझी प्रीती।
तूच दाता, तूच माता, तूच जीवाचा श्वास,
तुझ्या कृपेच्या सावलीत, संपतो जन्मांचा त्रास॥४॥
बघ उघडूनी दार अंतरी, पंढरपूर हेच झाले,
भक्त आणि भगवंतामध्ये, अंतर काहीच न राहिले।
कटीवर हात ठेवुनी म्हणे, “भिऊ नको रे जिवा”,
मीच तुझ्यात, तूच माझ्यात हा अनुभव चिरंतन नवा॥५॥
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212