साद अंतरीची

मनात दाटलेली साद ओठांवरी न आली,
नजरेतून मात्र सारी रात्र बोलत राहिली.

तुझ्या स्मृतींच्या धुक्याने वाट वेढून टाकली,
पहाट झाली तरीही सांज मनातच राहिली.

जखमांना हसण्याचे वस्त्र अलगद पांघरले,
राख वेदनेची तरी श्वासांतून उधळली.

आरशाला रोज माझा चेहरा नवा दिसला,
आतली ओळख मात्र एकांताशीच जोडली.

विश्वासाच्या नावाखाली स्वप्न किती जपले मी,
वेळ आली तेव्हा त्याने पाठ हळूच फिरवली.

आजही वाऱ्यावरी तुझ्या पावलांची चाहूल,
अंतरीची तीच साद अजूनही न विरली.

नाव तुझे उच्चरावे एवढीही हिंमत नाही,
मौन माझे मात्र सारी व्यथा सांगत राहिले.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



मनात दाटलेली साद ओठांवरी न आली,
नजरेतून मात्र सारी रात्र बोलत राहिली.

तुझ्या स्मृतींच्या धुक्याने वाट वेढून टाकली,
पहाट झाली तरीही सांज मनातच राहिली.

जखमांना हसण्याचे वस्त्र अलगद पांघरले,
राख वेदनेची तरी श्वासांतून उधळली.

आरशाला रोज माझा चेहरा नवा दिसला,
आतली ओळख मात्र एकांताशीच जोडली.

विश्वासाच्या नावाखाली स्वप्न किती जपले मी,
वेळ आली तेव्हा त्याने पाठ हळूच फिरवली.

आजही वाऱ्यावरी तुझ्या पावलांची चाहूल,
अंतरीची तीच साद अजूनही न विरली.

नाव तुझे उच्चरावे एवढीही हिंमत नाही,
मौन माझे मात्र सारी व्यथा सांगत राहिले.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author