आयुष्यात प्रत्येक क्षण
तलवार घेऊन उभा असतो,
आपल्या धैर्याची परीक्षा
नजरेतूनच घेत असतो.
कधी तो वार करतो
अपेक्षांच्या कोवळ्या फुलांवर,
कधी घाव घालतो
विश्वासाच्या मजबूत भिंतींवर.
काळाच्या या रणात
कोणीच अखंड जिंकत नसतो,
पण हरल्यानंतरही जो हसतो,
तोच खरा योद्धा ठरतो.
जखमांच्या लाल ठिपक्यांनी
जीवनाचा नकाशा रंगतो,
दुःखाच्या काळ्या ढगांतून
आशेचा चंद्र उगवतो.
तलवारीच्या प्रत्येक धारेत
एक नवा धडा दडलेला,
आणि प्रत्येक संपलेल्या लढाईत
एक नवा जन्म गुंतलेला.
म्हणून क्षणांच्या वारांना
छाती पुढे करून भेटावे,
कारण जगणे म्हणजे
तुटत तुटत पुन्हा उभे राहाणे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
[11:07, 09/07/2026] Ninad Sir: मनाला कुठे समजतं
मनाला कुठे समजतं,
तू जवळ आहेस की लांब,
तुझ्या आठवणींच्या सरी बरसल्या की,
भावनांना मिळतो नवा रंग.
तुझं नाव ओठांवर आलं की,
हृदय अलगद हसतं,
तुझ्या प्रत्येक स्मिताच्या आठवणीने,
मन पुन्हा प्रेमात हरवतं.
अंतर कितीही असो आपल्या मध्ये,
नातं मात्र कधी तुटत नाही,
तुझी हलकीशी चाहूल जरी लागली,
मन रोमँटिक झाल्याशिवाय राहत नाही.
तू नसतानाही तूच असतेस,
माझ्या प्रत्येक श्वासात,
म्हणूनच तुझी आठवण आली की,
प्रेम फुलतं नकळत मनात.
तुझ्या आठवणींच्या त्या गोड सावलीत,
मन रोज स्वतःला विसरतं,
आणि तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाने,
माझं जग पुन्हा नव्याने बहरतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212