आता एका झोपेची आस लागून राहिली,
डोळ्यांच्या काठाशी रात्र थांबून राहिली.
विचारांचे वादळ अजूनही शांत नाही,
मनाच्या आभाळी ढगांची गर्दी दाटून राहिली.
दिवसभराच्या जखमा शब्दांत मावत नाहीत,
मूक वेदना उशाशी अलगद बसून राहिली.
चांदण्यांनी खूप समजावलं या मनाला,
पण तुझ्या आठवणींची चाहूल जागून राहिली.
आता एका झोपेची आस लागून राहिली,
थकलेल्या श्वासांची वाट पाहत राहिली.
कधीतरी येईल निवांत स्वप्नांची सर,
तोवर ही रात्र माझ्याशी बोलत राहिली.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
आता एका झोपेची आस लागून राहिली,
डोळ्यांच्या काठाशी रात्र थांबून राहिली.
विचारांचे वादळ अजूनही शांत नाही,
मनाच्या आभाळी ढगांची गर्दी दाटून राहिली.
दिवसभराच्या जखमा शब्दांत मावत नाहीत,
मूक वेदना उशाशी अलगद बसून राहिली.
चांदण्यांनी खूप समजावलं या मनाला,
पण तुझ्या आठवणींची चाहूल जागून राहिली.
आता एका झोपेची आस लागून राहिली,
थकलेल्या श्वासांची वाट पाहत राहिली.
कधीतरी येईल निवांत स्वप्नांची सर,
तोवर ही रात्र माझ्याशी बोलत राहिली.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 4