अंकशास्त्र (NUMEROLOGY) हे संख्येद्वारे जीवनातील विविध पैलू समजून घेण्यास मदत करतो. अंकशास्त्र केवळ व्यक्तिमत्व आणि प्रवृत्तींबद्दलच सांगत नाही, तर भविष्याबद्दल अचूक अंदाजही लावते. त्यामुळेच आता अंकशास्त्र खूप लोकप्रिय झाले आहे. तसेच जे शतकानुशतके मानवी जीवनातील गुंतागुंत सोडविण्यात उपयुक्त ठरले आहे. ही विद्या जन्मतारीख, जन्मवर्ष किंवा नाव या अक्षरांवरून काढलेले आकडे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याबद्दल सांगण्यासाठी विश्वासार्ह मानले जाते.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ६,१५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.
अंकशास्त्रात शुक्राला मूलांक ६ चा स्वामी मानले आहे. मूलांक ६ हा संख्याशास्त्रानुसार सर्वाधिक श्रीमंत अंक मानला जातो. पण हा सर्वाधिक यशस्वी मूलांकही मानला जातो. हा ग्रह सुख, वैभव, प्रेम, विलासी जीवन, कार्य सुख, धन, वैभव आणि ऐश्वर्य म्हणजेच भगवंत, नियंत्रक आणि दाता ग्रहाचा कारक मानला जातो. शुक्रामुळे लक्झरी वस्तू मूलांक ६ असलेल्या लोकांना अधिक आकर्षित करतात.
मूलांक ६ च्या व्यक्तींचे स्वभाव आणि वैशिष्ट्ये:
– स्वभाव: हे लोक स्वभावाने खूप हळवे आणि प्रेमळ असतात.
– ते खूप स्टायलिश असतात आणि लोकांना आकर्षित करतात.
– सौंदर्य, कला आणि साहित्याची त्यांना विशेष आवड असते.
– स्वच्छता आणि नीटनेटकेपणा: त्यांना स्वच्छ राहायला आणि आजूबाजूला नीटनेटकेपणा आवडतो.
– अहंकारी स्वभाव: काही वेळा ते मर्यादित लोकांशीच मिसळतात, त्यामुळे त्यांना अहंकारी समजले जाऊ शकते
– करिअर: करिअर / पैसा अशा कोणत्याही करिअरची निवड करताना फॅशन मीडिया,डिझाईन ब्युटी प्रोडक्ट, एंटरटेनमेंट, ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटो शूट ,रेडिमेड गारमेंट, जेम्स आर्टस् ज्वेलरी ह्या क्षेत्राशी किंवा ह्या क्षेत्रात लागणाऱ्या वस्तूंशी ह्यांना जास्त लगाव असू शकेल तेव्हा अशा क्षेत्री ह्यांना करिअर करण्याचा सल्ला दिला जातो. मेडिकल क्षेत्रात हार्ट रिलेटेड प्रॅक्टिस मध्ये ह्यांचा चांगला हात असतो. रायटर, धर्मगुरू, हॉटेल इंदूस्ट्रीज मध्ये सुद्धा मूलांक ६ वाल्या व्यक्ती प्रगती करताना दिसतात. नर्सिंग व्यवसायात सुद्धा ६ नंबर च्या व्यक्ति ह्या चांगले काम करतात.
आयुष्यात अनेकदा प्रेमात पडतात :
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो अशा जन्मतारखेचे लोक अनेकदा प्रेमात पडतात. तसेच, हे लोक दिसायला फारच सुंदर असतात. स्वभावाने हे लोक फार रोमॅंटिक असतात. आपल्या सौंदर्याने इतरांना आकर्षित करतात. त्याचबरोबर हे लोक पैशांचा अगदी सर्रास वापर करतात. आपलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात. तसेच, कोणालाही हे लोक अगदी सहजतेने प्रपोज करु शकतात इतकी हिंमत ते दाखवतात. तसेच, यांना फिरण्याची देखील खूप आवड असते. ६ नंबर च्या व्यक्ती नेहमी खाणे पिणे आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वतःवर कोणत्याही मार्गाने खर्च करण्याची ह्यांची तयारी असते. दुसऱ्याची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर दिसतात. दयाळू स्वभाव असतो. जनावरे, झाडे झुडपे ह्यांबद्दल लगाव असतो.
वर्तमानात जगतात:
मूलांक 6 असणारे लोक वर्तमानात जगतात. त्याचबरोबर भविष्याचा विचार न करता विनाकारण पैसे उडवण्याची यापैकी अनेकांची सवय असते. स्वभावाने हे लोक फारच दयाळू आणि शांत असतात. तसेच, इतरांप्रती सहानुभूती यांना जास्त असते. या’ जन्मतारखेचे लोक असतात ‘ओव्हरथिंकर’; विचार करुन करुन डोक्याचा करतात भुगा, इतरांनाही यांचा मनस्ताप.
फार गोंधळलेले असतात:
या जन्मतारखेच्या लोकांची सतत विचार करण्याची सवय असल्यामुळे हे लोक फार गोंधळलेले असतात. आणि कोणत्याच निर्णयावर ते ठाम राहात नाहीत. यामुळे यांचं अनेकदा नुकसान होतं. त्यामुळे यांच्यात आत्मविश्वासाची देखील कमतरता पाहायला मिळते. यासाठीच यांच्या आयुष्यात यश फार उशिराने येतं.
कसं असतं आयुष्य?
या जन्मतारखेच्या लोकांचं आयुष्य तसं फार चांगलं असतं. स्वत:च्या मेहनतीने हे पैसा कमावतात. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहात नाहीत. तसेच, हे लोक जिथेही जातात तिथे आपली ओळख निर्माण करतात. देवाच्या कृपेने यांची आर्थिक स्थितीही चांगली असते. मात्र, ही स्थिती हळुहळू सुधारते.
देवी लक्ष्मीची असते विशेष कृपा:
मूलांक 6 च्या लोकांचं आर्थिक जीवनही चांगलं असतं. देवी लक्ष्मीची यांच्यावर विशेष कृपा असते. अनेकदा या जन्मतारखेच्या लोकांना आयुष्यात पैसा फार उशिरा मिळतो. मात्र, एकदा यांचं आयुष्य स्थिर झाल्यानंतर यांच्या आयुष्यात यश, पैसा आणि स्वातंत्र्य या तिन्ही गोष्टी टिकून राहतात.
६,१५ आणि २४ तारखेला जन्मलेले लोक तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्म घ्यावा अशी एक म्हण आहे, ज्याचा अर्थ ‘अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्माला येणे’ असा होतो. येथे आम्ही एका विशिष्ट मूल्याच्या 3 तारखेला जन्मलेल्या अशा लोकांबद्दल बोलत आहोत, ज्यांचे पालनपोषण एखाद्या राजकुमारासारखे होते.
– या क्षेत्रात ते खूप यशस्वी असतात मूलांक ६ असलेली लोकं सर्जनशील प्रतिभेने समृद्ध असतात आणि बऱ्याचदा केवळ कला, संगीत किंवा साहित्य यासारख्या क्षेत्रांमध्ये रस घेत नाहीत, तर व्यावसायिकरित्या बरेच पैसे आणि प्रसिद्धी देखील कमवतात. आकर्षणाचे केंद्र बनण्याचा ही त्यांना छंद आहे. हा शुक्र प्रभाव मानला जातो, जो सर्व ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी आहे.
नोकरी नाही…तर बिझनेसमध्ये चिक्कार पैसा कमावतात, न्यायाचेही तितकेच असतात पक्के त्याचबरोबर यांचा ड्रेसिंग सेन्स फार चांगला असतो. यांच्या व्यक्तिमत्त्वात किंवा स्वभावात कोणताच असा वाईट गुण नसतो. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक मनानेही तितकेच श्रीमंत असतात. त्याचबरोबर, या लोकांची अनेकदा परदेशवारी असते. यांना जीवनातील सर्व सुख समृद्धीचा लाभ घेता येतो.
समाजात मिळतो मान-सन्मान:
या जन्मतारखेच्या लोकांना समाजात मान-सन्मानही फार मिळतो. या लोकांना न्याय अतिशय प्रिय असतो. त्यामुळे न्यायाने दिलेली वागणूक यांना आवडते. यांचं ध्येय फार क्लिअर असतं. त्याचबरोबर या जन्मतारखेचे लोक व्यवसायात जोखीम घेऊन पैसा कमावतात. लीडरशीप क्वालिटी यांच्या फार असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाने हे लोक इतरांना प्रभावित करतात.
६ क्रमांकाचे लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि दिसायला सुंदर असतात. या लोकांचे म्हातारपण लवकर दिसून येत नाही. त्यांचे आयुष्मान जास्त असते. ते शंभरीही पार करू शकतात.
आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन:
– ६ नंबर च्या प्रभावित असणाऱ्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीला ओळखताना उशीर होतो. प्रथम त्या व्यक्तीबद्दल हे एकदम शाश्वत असतात पण काही कालांतराने त्या व्यक्तीबद्दल हे हिरमुसले जातात. म्हणून कोणत्याही व्यक्तीवर किती ट्रस्ट करावा हे ह्यांनी प्रथम जाणून घ्यावे.
– जीवनात ह्या व्यक्तींना एकदा तरी समोरच्या व्यक्तींकडून विश्वासघात होतो. दुसरी गोष्ट ह्या ६ नंबरच्या व्यक्ती स्वतःच्या बाहेरील विश्वात स्वतःला दाखविण्यासाठी एव्हढे मग्न असतात कि त्यांना त्यांच्या आतल्या स्किल चा मागमूस लागत नाही की ते काय काय करू शकतात. म्हणून केव्हा केव्हा करिअर मध्ये ह्यांना उशीर होतो. वाढत्या वयात आल्यावर त्याची जाण होते पण तेव्हा उशीर झालेला असतो.
– तिसरा गुण ह्यांना दुसर्यांना मदत करण्याचा एक वाईट अनुभव असा येतो कि ती व्यक्ती ह्यांना नंतर दूर करते किंवा ह्यांना नंतर कळते कि आपण स्वतःकडे दुर्लक्षित झालो. त्यामुळे वरील सर्व मुद्द्यांवर आपण सावधान राहिले पाहिजे असा सल्ला दिला जातो.
– खाण्यापिण्याच्या सवयीवर जास्त दुर्लक्ष नको कारण नंतर ह्यांना त्रास होताना पाहिले गेले आहे.
शुभ रंग:- निळा सफेद आणि वांगी रंगाचा उपयोग शुभत्व देतो. गुलाबी रंग सर्वात चांगला.
अशुभ रंग:- काळा आणि लाल
भाग्यवान दिवस:- शुक्रवार
लकी नंबर्स:- ६ काही वेळा ३ आणि ९, ५ सुद्धा चांगला जातो.
शत्रू नंबर:- ४, ८ हे नंबर ह्यांना शत्रुत्व किंवा नुकसान दायक असू शकतात. ज्या वयाची/वर्षांची किंवा तारखांची बेरीज सुद्धा ४ किंवा ८ येते ती वर्षे सुद्धा जास्त त्रासदायक असू शकतील.१३,२२,३१,४०,१७,३५,४४
महिन्याच्या शुभ तारखा:- ६,१५,२४
जीवनातील शुभ वर्षे:- २१/२४/३०/३३/३९/४२ हि वयाची वर्षे विशेष असतील. आणि ज्या वर्षाची बेरीज हि ६ असेल उदारणार्थ २०२२= ६. किंवा २००४ वगैरे. ज्या वर्षाची बेरीज ६ येते किंवा ज्या वयाची बेरीज ६ येते अशी सर्व वर्षे आपल्याला शुभ असतात. ह्यात काही नवीन निर्णय सुरुवात करू शकता.
आजार:- हार्ट डिसीज, छातीचे दुखणे, पाठ दुखी , गळ्याचे सर्व आजार, डायबिटीज, ९०% व्यक्तींना कोलोस्ट्रॉल ४०/५० नंतर जास्त होण्याचे दिसते. ह्यांना खाण्यापिण्यावर जर ताळतंत्र नसेल तर पुढे एका विशिष्ट सेवनाने जो त्रास होतो त्यावरील आजारांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. स्किन बद्दल काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा देण्यात येतो.
मूलांक ६: २०२६ चे वार्षिक भविष्य:
मूलांक ६ (६, १५, २४ तारखेला जन्मलेले) व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष सुख-सुविधा, प्रेमसंबंध आणि आर्थिक प्रगतीचे सुवर्णवर्ष ठरणार आहे. शुक्र व सूर्य यांच्या प्रभावामुळे करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि सुसंवाद वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील, मात्र चैनीवर खर्च वाढू शकतो. नातेसंबंधात गांभीर्य आणि लग्नगाठ पडण्याचे उत्तम योग आहेत. करिअर आणि व्यवसाय: नवीन स्टार्टअप किंवा नोकरीत बढतीची शक्यता आहे. कला, डिझाइन, फॅशन किंवा लक्झरी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना मोठी प्रसिद्धी आणि यश मिळू शकते. आर्थिक स्थिती: पैसा भरपूर येईल, पण खर्चही वाढू शकतो. महागड्या वस्तू किंवा मालमत्तेत गुंतवणूक कराल. आर्थिक नियोजनाची गरज राहील. प्रेम आणि नातेसंबंध: हे वर्ष प्रेमासाठी अत्यंत रोमँटिक आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकते. जोडीदारासोबत सुसंवाद राहील आणि जुने गैरसमज दूर होतील.
आरोग्य: आरोग्य मध्यम राहील. अति कामामुळे थकवा जाणवू शकतो. त्वचेचे विकार किंवा पचनाच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
टीप: २०२६ ची बेरीज (२+०+२+६ = १०, १+०=१) १ असल्याने सूर्याचा प्रभाव असेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
उपाय: शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करा आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा वापर वाढवा. अंकशास्त्रानुसार मूलांक ६ असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष संमिश्र फलदायी असले तरी प्रगतीकारक ठरणारे आहे. करिअरमध्ये विकासासाठी नवीन संधी मिळेल त्याचा लाभ घ्या. मूलांक ६ असणारे जे लोक फॅशन, डिझाईन, ब्युटी किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना विशेष फायदा मिळू शकतो. व्यवसायातही यशाचा मार्ग सुकर होईल मात्र, खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखणे आवश्यक आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुमच्या कामाचे खास कौतुक होणार आहे. प्रेमसंबंधात गोडवा असेल तर वैवाहिक जीवनातही आनंद आणि समाधान असेल. तब्येतीच्या दृष्टीने पचनाशी संबंधित काही त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभ अंक : ३ आणि ६
शुभ रंग : गुलाबी
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
०८.०३.२०२६