आठवणींची खोली

त्या खोलीत अजूनही क्षण अलगद फिरत आहेत,
भिंतींवर माझ्या जगण्याचे ठसे जिवंत आहेत.
दमलो की मी तिच्या कुशीत विसावून जायचो,
ती निःशब्दपणे माझ्या वेदना सामावून घ्यायची.

ती खिडकी अजूनही बाहेरचं जग दाखवते,
पण आत माझ्याच आठवणी अलगद साठवते.
तो डेस्क म्हणेज स्वप्नांचा एक शांत साक्षीदार,
कधी आनंद, कधी मनातला न बोलेला भार.

दार अजूनही तसंच किरकिरतं हलकंसं,
जणू माझं नाव हळूच घेतं अलगदसं.
तो पंखा… करकर फिरतो हळुवार,
हवा नाही, पण फिरतात क्षण हजार.

हास्याचे तुकडे, अश्रूंचे ओले ठसे,
सगळं जपून ठेवते ती जागा निःशब्द पणे.
मी आत जातो तेव्हा वेळ मागे फिरतो,
प्रत्येक कोपरा मला पुन्हा एकदा भेटतो.

आता कळतं...
ती फक्त खोली नाही,
माझ्या आयुष्याची जपलेली एक कहाणी आहे काही.
जिथे मी हरवतो, पुन्हा स्वतःला सापडतो,
आणि प्रत्येक आठवणीत थोडासा जगत राहतो...

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



त्या खोलीत अजूनही क्षण अलगद फिरत आहेत,
भिंतींवर माझ्या जगण्याचे ठसे जिवंत आहेत.
दमलो की मी तिच्या कुशीत विसावून जायचो,
ती निःशब्दपणे माझ्या वेदना सामावून घ्यायची.

ती खिडकी अजूनही बाहेरचं जग दाखवते,
पण आत माझ्याच आठवणी अलगद साठवते.
तो डेस्क म्हणेज स्वप्नांचा एक शांत साक्षीदार,
कधी आनंद, कधी मनातला न बोलेला भार.

दार अजूनही तसंच किरकिरतं हलकंसं,
जणू माझं नाव हळूच घेतं अलगदसं.
तो पंखा… करकर फिरतो हळुवार,
हवा नाही, पण फिरतात क्षण हजार.

हास्याचे तुकडे, अश्रूंचे ओले ठसे,
सगळं जपून ठेवते ती जागा निःशब्द पणे.
मी आत जातो तेव्हा वेळ मागे फिरतो,
प्रत्येक कोपरा मला पुन्हा एकदा भेटतो.

आता कळतं…
ती फक्त खोली नाही,
माझ्या आयुष्याची जपलेली एक कहाणी आहे काही.
जिथे मी हरवतो, पुन्हा स्वतःला सापडतो,
आणि प्रत्येक आठवणीत थोडासा जगत राहतो…

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author