तुझ्या ओठांवर

मंद श्वासांची ऊब थरथरे तुझ्या ओठांवर,
चांदण्यांची धुंदी अलगद सरे तुझ्या ओठांवर.

नजरेतून उतरते जळती एक हळवी चाहूल,
देहाची कोमल लहर विसावे तुझ्या ओठांवर.

स्पर्श तुझा जसा मदिर संध्या वितळती,
माझी प्रत्येक धडधड झुके तुझ्या ओठांवर.

बोल न उच्चरता सारे काही घडते,
अधीर गुपित हळूच फुले तुझ्या ओठांवर.

माझ्या बोटांची रेषा थांबे गालांशी,
आणि श्वासांची रात्र झुके तुझ्या ओठांवर.

क्षण तो विरघळतो उष्ण मिठीत शांत,
सारे जग थांबून बघे तुझ्या ओठांवर.

आता इतकीच माझी दुनिया,
जन्मोजन्मीची प्रीती साठे तुझ्या ओठांवर.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे



मंद श्वासांची ऊब थरथरे तुझ्या ओठांवर,
चांदण्यांची धुंदी अलगद सरे तुझ्या ओठांवर.

नजरेतून उतरते जळती एक हळवी चाहूल,
देहाची कोमल लहर विसावे तुझ्या ओठांवर.

स्पर्श तुझा जसा मदिर संध्या वितळती,
माझी प्रत्येक धडधड झुके तुझ्या ओठांवर.

बोल न उच्चरता सारे काही घडते,
अधीर गुपित हळूच फुले तुझ्या ओठांवर.

माझ्या बोटांची रेषा थांबे गालांशी,
आणि श्वासांची रात्र झुके तुझ्या ओठांवर.

क्षण तो विरघळतो उष्ण मिठीत शांत,
सारे जग थांबून बघे तुझ्या ओठांवर.

आता इतकीच माझी दुनिया,
जन्मोजन्मीची प्रीती साठे तुझ्या ओठांवर.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author