नको येऊस परत

नको आता तुझं परत येणं,
त्या दारावरची पाऊलखूण पुसून टाक.
एकदा गेलीस तर,
गेल्याचं ओझं नीट वाहून जा,
परत येऊन जखमांना
नावं देऊ नकोस.

परत येणं आणि पुन्हा निघून जाणं
हा खेळ नाही प्रेमाचा,
तो तर आत्म्याला थकवणारा
हिशोब असतो,
ज्यात हरतो नेहमी
विश्वास.

माफी, क्षमा, स्पष्टीकरणं
आता शब्द राहिले नाहीत,
ते फक्त जुन्या जखमांवर
मीठ चोळणारे बहाणे झालेत.

एकदा ठेच लागल्यानंतर
पाय आपोआप सावध होतात,
आणि मन तर अजूनच.

त्याच जाळ्यात
पुन्हा अडकायचं नाही,
कारण सुटताना
स्वतःलाच गमावावं लागतं.

म्हणून ऐक,
नको येऊस परत.
या अंतरात
मी स्वतःला पुन्हा उभं करतोय,
आणि तुझ्याशिवायही
मी आता संपूर्ण व्हायला शिकतोय.
म्हणूनच ऐक ना,
आता तुझं परत येणं नको,
आता तुझं परत येणं नको.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे



नको आता तुझं परत येणं,
त्या दारावरची पाऊलखूण पुसून टाक.
एकदा गेलीस तर,
गेल्याचं ओझं नीट वाहून जा,
परत येऊन जखमांना
नावं देऊ नकोस.

परत येणं आणि पुन्हा निघून जाणं
हा खेळ नाही प्रेमाचा,
तो तर आत्म्याला थकवणारा
हिशोब असतो,
ज्यात हरतो नेहमी
विश्वास.

माफी, क्षमा, स्पष्टीकरणं
आता शब्द राहिले नाहीत,
ते फक्त जुन्या जखमांवर
मीठ चोळणारे बहाणे झालेत.

एकदा ठेच लागल्यानंतर
पाय आपोआप सावध होतात,
आणि मन तर अजूनच.

त्याच जाळ्यात
पुन्हा अडकायचं नाही,
कारण सुटताना
स्वतःलाच गमावावं लागतं.

म्हणून ऐक,
नको येऊस परत.
या अंतरात
मी स्वतःला पुन्हा उभं करतोय,
आणि तुझ्याशिवायही
मी आता संपूर्ण व्हायला शिकतोय.
म्हणूनच ऐक ना,
आता तुझं परत येणं नको,
आता तुझं परत येणं नको.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author