॥ श्री गणेशाय नमः ॥

शुभे गणेशा वंदन ।
करो कार्य निर्विघ्न पूर्ण ।
मुंजीचा हा मंगल विधी ।
आज घडो परम पावन ॥१॥

गुरुचरणी मस्तक ठेवोनी ।
वेदमार्गे बुद्धी वाढोनी ।
ब्रह्मचर्य व्रत स्वीकारोनी ।
धर्माचरण नित्य मनी ॥२॥

मातृपितृ ऋण स्मरोनी ।
कुलाचार राखो जनी ।
शील, संयम, सदाचार ।
अलंकृत होवो व्यवहार ॥३॥

विद्या, विवेक, दीर्घायुष्य ।
आरोग्य, यश, सौभाग्य ।
ईश्वरकृपा सदा राहो ।
बालकाचे जीवन उजळो ॥४॥

मुंजीचा हा शुभसंस्कार ।
सकळ स्वकीयांस आनंद अपार ।
मंगलाष्टक म्हणून म्हणू ।
ईश्वर चरणी नतमस्तक होऊ ॥५॥

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे



शुभे गणेशा वंदन ।
करो कार्य निर्विघ्न पूर्ण ।
मुंजीचा हा मंगल विधी ।
आज घडो परम पावन ॥१॥

गुरुचरणी मस्तक ठेवोनी ।
वेदमार्गे बुद्धी वाढोनी ।
ब्रह्मचर्य व्रत स्वीकारोनी ।
धर्माचरण नित्य मनी ॥२॥

मातृपितृ ऋण स्मरोनी ।
कुलाचार राखो जनी ।
शील, संयम, सदाचार ।
अलंकृत होवो व्यवहार ॥३॥

विद्या, विवेक, दीर्घायुष्य ।
आरोग्य, यश, सौभाग्य ।
ईश्वरकृपा सदा राहो ।
बालकाचे जीवन उजळो ॥४॥

मुंजीचा हा शुभसंस्कार ।
सकळ स्वकीयांस आनंद अपार ।
मंगलाष्टक म्हणून म्हणू ।
ईश्वर चरणी नतमस्तक होऊ ॥५॥

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author