लेखणीची प्रार्थना

हे देवा...
माझ्या लेखणीला दुःख जाणण्याची ताकद दे,
निःशब्द अश्रूंनाही शब्द मिळण्याची वाट दे.
जगाच्या जखमा कागदावर उमटू देत,
आणि प्रत्येक ओळीत माणुसकीची हाक दे.

माझी लेखणी फक्त शाईत न भिजो,
ती मनांच्या वेदनेत खोलवर न्हाऊ दे.
तुटलेल्या स्वप्नांचा हळवा आवाज
माझ्या शब्दांत अलगद सामावू दे.

जगाच्या गर्दीत हरवलेल्या मनांना
माझ्या कवितेत थोडा निवांत श्वास मिळू दे.
अशी ओळ उमटू दे देवा,
की वाचताना कुणाच्या डोळ्यात दडलेला अश्रू वाहू दे.

माझे शब्द मोठे नसले तरी चालतील,
पण त्यात करुणेची ऊब असू दे,
माझी कविता फक्त वाचली जाऊ नये,
ती एखाद्या जखमी मनाला हलकेच समजून घेऊ दे.

शेवटी इतकंच मागणं देवा तुझ्यापाशी,
माझी लेखणी माणुसकीची ज्योत बनू दे.
मी नसतानाही कधीतरी कुणाच्या ओठांवर
माझी कविता एखाद्या आशेचा श्वास बनू दे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



हे देवा…
माझ्या लेखणीला दुःख जाणण्याची ताकद दे,
निःशब्द अश्रूंनाही शब्द मिळण्याची वाट दे.
जगाच्या जखमा कागदावर उमटू देत,
आणि प्रत्येक ओळीत माणुसकीची हाक दे.

माझी लेखणी फक्त शाईत न भिजो,
ती मनांच्या वेदनेत खोलवर न्हाऊ दे.
तुटलेल्या स्वप्नांचा हळवा आवाज
माझ्या शब्दांत अलगद सामावू दे.

जगाच्या गर्दीत हरवलेल्या मनांना
माझ्या कवितेत थोडा निवांत श्वास मिळू दे.
अशी ओळ उमटू दे देवा,
की वाचताना कुणाच्या डोळ्यात दडलेला अश्रू वाहू दे.

माझे शब्द मोठे नसले तरी चालतील,
पण त्यात करुणेची ऊब असू दे,
माझी कविता फक्त वाचली जाऊ नये,
ती एखाद्या जखमी मनाला हलकेच समजून घेऊ दे.

शेवटी इतकंच मागणं देवा तुझ्यापाशी,
माझी लेखणी माणुसकीची ज्योत बनू दे.
मी नसतानाही कधीतरी कुणाच्या ओठांवर
माझी कविता एखाद्या आशेचा श्वास बनू दे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author