मला तुझा वेळ हवा आहे

महाग पडेल तुला माझ्यावरचं प्रेम,
कारण मी स्वप्नं विकत घेत नाही,
मी क्षण मागतो.

तुझ्या हातातल्या भेटींपेक्षा मला तुझ्या हाताची ऊब हवी आहे,
जी माझ्या बोटांना अलगद कवटाळते.

तू आणशील कदाचित
माझ्यासाठी जपलेले गोड शब्द, हलकंसं हसू,
पण मला हवंय ते
तुझं निखळ हास्य,
जे फक्त माझ्यासाठी खुलतं.

मी हट्टी आहे थोडा,
कारण मला भेट म्हणून
तुझ्या दिवसातील काही तास हवेत.
ज्यात तू फक्त माझी असशील,
आणि जग थांबलेलं असेल.

महागड्या रेस्टॉरंटमध्ये मेणबत्त्या नकोत,
एखाद्या शांत कोपऱ्यात
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून
संपलेली संध्याकाळ हवी आहे.

जर प्रेम करशील माझ्यावर,
तर भेट म्हणून फक्त एवढंच दे.
तुझं लक्ष, तुझा स्पर्श,
आणि तुझा अमूल्य वेळ.

कारण मला महाग वस्तू नकोत,
मला हवी आहेस तू,
पूर्णपणे, मनापासून,
क्षणोक्षणी.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



महाग पडेल तुला माझ्यावरचं प्रेम,
कारण मी स्वप्नं विकत घेत नाही,
मी क्षण मागतो.

तुझ्या हातातल्या भेटींपेक्षा मला तुझ्या हाताची ऊब हवी आहे,
जी माझ्या बोटांना अलगद कवटाळते.

तू आणशील कदाचित
माझ्यासाठी जपलेले गोड शब्द, हलकंसं हसू,
पण मला हवंय ते
तुझं निखळ हास्य,
जे फक्त माझ्यासाठी खुलतं.

मी हट्टी आहे थोडा,
कारण मला भेट म्हणून
तुझ्या दिवसातील काही तास हवेत.
ज्यात तू फक्त माझी असशील,
आणि जग थांबलेलं असेल.

महागड्या रेस्टॉरंटमध्ये मेणबत्त्या नकोत,
एखाद्या शांत कोपऱ्यात
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून
संपलेली संध्याकाळ हवी आहे.

जर प्रेम करशील माझ्यावर,
तर भेट म्हणून फक्त एवढंच दे.
तुझं लक्ष, तुझा स्पर्श,
आणि तुझा अमूल्य वेळ.

कारण मला महाग वस्तू नकोत,
मला हवी आहेस तू,
पूर्णपणे, मनापासून,
क्षणोक्षणी.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author