आयुष्य म्हणजे चालती कविता,
ओळी ओळींत नवी कथा.
कधी हसूचे हलके शब्द,
कधी दुःखाची लपलेली छाया.
क्षणांच्या या कागदावरती,
अनुभवांची शाई ओघळते.
कधी विराम, कधी उद्गार,
मनातली गोष्ट उलगडते.
स्वप्नांची यमकं जुळवताना,
कधी तुटतात ताल-छंद.
तरीही पुढे लिहित राहते,
जीवनाची कविता अखंड.
चुका, शिकवण, आठवणी,
सगळं काही गुंफलं जातं.
कविता जशी पूर्ण होत नाही,
तसंच आयुष्यही लिहित राहतं.
आणि शेवटच्या त्या शांत क्षणी,
जेव्हा पान अलगद मिटतं,
डोळ्यांत दाटलेल्या शब्दांतून,
सगळं आयुष्यच कविता बनतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212