दूतघटोत्कच

भासांचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा याचा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते व्यायोग रूपकप्रकार आहे, परंतु या रूपकाची लक्षणे उत्सृष्टिकांकाला अधिक लागू पडणारी आहेत या नाटकातील सर्व पात्रे ही महाभारतातील प्रसिद्ध पात्र असली तरी कथानक संपूर्णत: कवींच्या कल्पनेतून साकारलेले आहे.घटोत्कचाने दूत म्हणून कौरवां कडे जाणे असा या नाटकातील प्रसंग मूळ महाभारतात नाही.



भासांचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा याचा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते व्यायोग रूपकप्रकार आहे, परंतु या रूपकाची लक्षणे उत्सृष्टिकांकाला अधिक लागू पडणारी आहेत या नाटकातील सर्व पात्रे ही महाभारतातील प्रसिद्ध पात्र असली तरी कथानक संपूर्णत: कवींच्या कल्पनेतून साकारलेले आहे.घटोत्कचाने दूत म्हणून कौरवां कडे जाणे असा या नाटकातील प्रसंग मूळ महाभारतात नाही.

युद्धाच्या वेळी कौरवांनी आपल्या सैन्याची एक तुकडी वेगळी काढली त्यामुळे तिच्याबरोबर लढण्यासाठी अर्जुन आणि श्रीकृष्ण गेले त्यांना इतर पांडवापासून दूर करण्याची कौरवांची योजना सफल झाली आणि पांडवांशी लढणे सोपे झाले. द्रोणाचार्यांनी खास चक्रव्यूहाची रचना केली. ती भेदण्यासाठी अभिमन्यू हा एकच वीर समर्थ होता त्याच्यामागे उरलेले चार पांडव तयार झाले. अभिमन्यूने मोठा पराक्रम करून कौरवांना जेरीस आणले. कौरवांना पराभवाची भीती वाटू लागली. त्यामुळे कौरवांच्या जावयाला जयद्रथ याला बोलवण्यात आले. आपल्याला मिळालेल्या वराचा वापर जयद्रथाने केला . अभिमन्युला रथहीन आणि धनुष्यहीन करून कौरव आणि त्याला घेराव घातला आणि सर्व कौरवांनी मिळून अभिमन्यु वर अमानुष प्रहार केले व शेवटी जयद्रथाने त्याला मारले. संसप्तकां वर विजय मिळून आलेला अर्जुनाचा राग अनावर झाला व त्याने सूर्यास्त होण्याच्या आत जयद्रथाला ठार मारण्याची प्रतिज्ञा केली व ते शक्य न झाल्यास स्वतः अग्निप्रवेश करण्याची प्रतिज्ञा केली. या पार्श्वभूमीवर दूतघटोत्कच नाटकाची सुरुवात होते. अर्जुनाच्या या प्रतिज्ञेने गांधारी घाबरली आहेत. धृतराष्ट्राला ही खात्री आहे की अर्जुनाची धनुष्य आता कौरवाच्या संहार करूनच विश्रांती घेईल अभिमन्यूच्या वधाला जयद्रथ कारणीभूत आहेत हे तेव्हा धृतराष्ट्राला समजते तेव्हा त्याला अतिशय राग येतो व त्याची बरोबर अभिमन्यू बरोबर करू नये वाटते त्यानंतर दुर्योधन, दुशासन ,शकुनि वगैरे मंडळी धृतराष्ट्र कडे येतात. त्यांच्या नमस्कारालाही धृतराष्ट्र उत्तर देत नाहीत. त्याच्या मौनाबद्दल विचारल्यावर तो त्याला चुकीची मोठी शिक्षा मिळणार असल्याबद्दल सांगतो. तसेच अभिमन्युला मारणे हा पराक्रम नसून तो दुबळेपणा आहे असेही तो सांगतो. यावर दुर्योधन म्हणतो की, ज्याने पितामह भीष्मांचा वध केला त्याच्या बाबतीत हे योग्यच आहे. यावर धृतराष्ट्र त्यांना धोक्याची सूचना देतो की, अर्जुन त्याच्या मुलाच्या वधाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. धृतराष्ट्र अर्जुनाच्या अमोघ बाणांचे वर्णन करतात असाच भूकंप आणि उल्कापात अर्जुनाच्या प्रतिज्ञे मुळेच झाल्याचे समजते. अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाल्यास अर्जुन अग्निप्रवेश करणार असल्याचे समजल्यावर दुर्योधन प्रतिज्ञा पूर्ण करण्यास अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न करतो. तेव्हा श्रीकृष्ण संदेश घेऊन घटोत्कच दूत म्हणून येतो. स्वतःची ओळख करून देतो, धृतराष्ट्राला नमस्कार करतो. आणि अभिमन्यूच्या वधामुळे संतप्त झालेल्या कृष्णाचा संदेश सांगतो. यावर दुर्योधन म्हणतो की, कृष्ण हा काही राजा नाही त्यामुळे त्याच्या संदेशा कडे लक्ष देण्याची गरज नाही. यावर घटोत्कच श्रीकृष्णाचे राजराजेश्वरत्व सांगतो, त्याच्या मोठेपणाचे वर्णन करतो. कौरव घटोत्कचाचे राक्षस म्हणून हेटाळणी करतात. तेव्हा कौरवांपेक्षा पांडवाची वागणूक कशी माणुसकीला धरून आणि दयाळूपणाची आहे हे घटोत्कच सिद्ध करतो. त्यावर दुर्योधन त्याला गप्प राहायला सांगून कृष्णाच्या संदेशाचे उत्तर आम्ही युद्धभूमीवर तीक्ष्ण बाणांनी देऊ असे सांगतो. शेवटी घटोत्कच त्यांना सन्मार्गावर जाण्याचा उपदेश करतो.

घटोत्कचाच्या प्रवेशापासून वीर हा रस असला तरी करुण रस नाटकाचे अंतर्गत सूत्र बांधून ठेवतो. धृतराष्ट्र गांधारी व दु:शासन यांच्या संवादात करूण रस प्रमुख आहेत . कृष्णाच्या सर्वशक्तिमान रूपाचे दर्शन दाखवण्यासाठीच भासाने हे नाटक रचले असावे . या नाटकाचा शेवट अकस्मातपणे झाल्या सारखा वाटतो या नाटकाला भरतवाक्य नाही.

कु. वैशाली भालचंद्र काकडे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. अंतिम वर्ष.
दि. ०२.०२.२०२२

Author