प्रतिमा

रामायणकथेवर आधारीत भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भास यांच्या सर्वोत्कृष्ट नाटकांपैकी प्रतिमा हे एक नाटक . यात रामाच्या वनवासात जाण्यापासून ते रावणाचा वध आणि रामाचा राज्याभिषेक या घटनांना भास यांनी स्थान दिले आहे राजा दशरथाच्या मृत्यूनंतर भरत आपल्या आजीच्या घरुन परततांना अयोध्येजवळच्या रस्त्यावर असलेल्या देवकुळात पूर्वजांच्या मूर्ती पाहतो. तेथे दशरथाची मूर्ती पाहून भरताला त्यांच्या मृत्यूचा अंदाज येतो. प्रतिमा दर्शनाचा घटनेमुळे याला प्रतिमा नाटक असे नाव देण्यात आले.



रामायणकथेवर आधारीत भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भास यांच्या सर्वोत्कृष्ट नाटकांपैकी प्रतिमा हे एक नाटक . यात रामाच्या वनवासात जाण्यापासून ते रावणाचा वध आणि रामाचा राज्याभिषेक या घटनांना भास यांनी स्थान दिले आहे राजा दशरथाच्या मृत्यूनंतर भरत आपल्या आजीच्या घरुन परततांना अयोध्येजवळच्या रस्त्यावर असलेल्या देवकुळात पूर्वजांच्या मूर्ती पाहतो. तेथे दशरथाची मूर्ती पाहून भरताला त्यांच्या मृत्यूचा अंदाज येतो. प्रतिमा दर्शनाचा घटनेमुळे याला प्रतिमा नाटक असे नाव देण्यात आले.

या नाटकात भास यांनी पात्रांची उत्कृष्टता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. इतिहास आणि व्यक्तिचित्रण या दोन्ही दृष्टिकोनातून हे नाटक यशस्वी ठरले आहे अभिव्यक्तीसाठी अनुकूल भाषा आणि लहान लहान वाक्ये ही भासांचा नाटकाची वैशिष्ट्ये आहेत.

करुणरसावर आधारित हे नाटक असून इतर रसही यात मदतनीस म्हणून आले आहेत, पुतळा बनवण्याच्या कथेला भासांची स्वत:ची मौलिकता आहे या नाटकात मौलिकता आणण्यासाठी भासांनी प्रचलित रामचरितापासून काहीसा वेगळेपणा आणला आहे. यातील काही घटना प्रचलित कथेपेक्षा वेगळया असल्या तरी नाट्यमय दृष्टिकोनातून त्यांचे महत्व जास्त आहे आणि या घटनांमुळे वाचकांची उत्सुकता वाढण्यास मदत झाली आहे. रामाच्या राज्यभिषेकाची तयारी, वल्कल प्रसंग, अभिषेक थांबणे, लक्ष्मणाचा संताप, राम सीता, लक्ष्मण यांचे वनात प्रस्थान इत्यादी कथाभाग प्रथम अंकात आहे. द्वितीय अंकात दशरथाचा विलाप तृतीय अंकात भरताचा अयोध्या प्रवेश, प्रतिमा गृह प्रसंग, कैकयीला दूषणे देऊन भरताचे रामास भेटायला जाणे, चतुर्थ अंकात राम -भरत भेट, रामाच्या पादुका घेउन भरताचे अयोध्येस परतणे या बाबी आहेत. पाचव्या अंकात राम सीता दशरथच्या श्राद्धाविषयी बोलत असताना संन्यासी रूपात रावणाचा प्रवेश, श्राद्धासाठी कांचन मृगचर्म उत्तम असल्याचे रावणाकडून समजल्यावर राम ते मिळवण्यासाठी जाताच रावणाकडून सीताचे अपहरण, रावण – जटायू युद्ध, जटायूचा मृत्यू हे प्रसंग वर्णित आहेत सहाव्या अंकात तपस्वी कडून रावण जटायू युद्धाचे वर्णन, विष्कंभक जनस्थानातून सुमंत्राचे आगमण, सीतापहरणाची वार्ता समजल्यावर भरत कडून कैकयीची निर्भत्सना, कैकयीचे स्पष्टीकरण, भरताला पश्चाताप रामाच्या मदतीसाठी सैन्य पाठवणे हे प्रसंग आहेत सातव्या अंकात लंकेतून विजयी होऊन राम सीतेसह जनस्थानात येतो. तिथे तीनही राजमातांना घेऊन भरत शत्रूघा सह येतो रामास अभिषेक होउन सर्वजण अयोध्येस परततात. रामाचा वनात झालेला राज्यभिषेक या नाटकात मुळ आहे. दशरथाला भरताचा विरह हा नैसर्गिक होता, या विरहाने त्याचा देहांत होण्याचा संभव नव्हता परंतु त्याचे रामावर इतके प्रेम होते की त्यांचा थोडाही विरह देखील सहन झाला नसता म्हणून कैकयी रामास वनात पाठवण्याचे योजते राम दुरावला तर दशरथ जिवंत राहणार नाही, शापाची सिद्धि झाली म्हणजे निवृत्तीही होईल निर्घृण नियतीला समाधान देऊनही हुलकावणी देण्याचा हा डाव ती कुलगुरूंच्या संमतीने रचते ती रामाला चौदा दिवसच वनात पाठवणार असते ,परंतु तनावपूर्व मानसिकतेतून चौदा वर्षे बोलून जाते, हे कैकयीनी दिलेले स्पष्टीकरण ऐकून भरतास पश्चाताप होणे, रामाच्या मदतीसाठी सैन्य पाठवणे इत्यादी नवीन कथाभाग योजून भासाने भरताच्या व्यक्तिरेखेस उठाव दिला आहे. सातव्या अंकातील जनस्थानात झालेल्या रामाण अभिषेक हे सर्वच प्रसंग भासाने आपल्या उत्तुंग प्रतिभेतून व कल्पनाशक्तीतून चित्रित केले आहे.

कु. शुभांगी अनंता डोंगरकर
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
वाङ्मय स्नातक अंतिम वर्ष
दि. १२.१.२०२२

Author