सुभाष शहा यांनी 1965 मध्ये आपले बंधु विमलकुमार यांच्या समवेत चेतन फौंड्रीची स्थापना करून उद्योगाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांना वालचंद समुह, कुपर, एस्कॉर्ट, एच. एम. टी. सारखे ग्राहक मिळाले.
शहा यांचे सुपुत्र यतिन यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर 1992 साली प्रिसिजन उद्योग समुहाचा श्रीगणेशा केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या प्रिसिजनने सन 2007 मध्ये ब्रिटनची व्हल्वट्रेन कंपनी ताब्यात घेतली. मारूती, ह्युंदाई, अमेरिका कॅनेडा व भारतातील जनरल मोटर्स, भारतीय रेल्वे, टाटा आदी कंपन्यांना कॅम्पशाफ्टस पुरविणारी प्रिसिजन ही आता एकमेव कंपनी बनली आहे. कॅमशाफ्टस निर्मीतीमध्ये जगात तिसर्या स्थानावर प्रिसिजनला नेण्यात सुभाष यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
सामाजिक क्षेत्रातही शहा यांचा मोठा सहभाग होता. शिवस्मारकाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय संघपरिवाराशी ते निगडीत होते. श्रविका शिक्षण संस्था, रोटरी क्लबला त्यांचे मार्गदर्शन लाभत होते.