यतीन वाघ

वाघ, यतीन

गोदावरीला महापूर आल्यानंतर जिवाची पर्वा न करता पाण्यात उतरून नागरिकांना मदत करण्याची हिंमत दाखविण्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते.. असा प्रसंग २००८ सालच्या पुरात खरोखरच आला होता आणि यतीन वाघ ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. नाशिक नगरीचे मनसेचे पहिलेच महापौर म्हणून जबाबदारी आलेले अ‍ॅड. यतीन वाघ यांनी यांसारख्या अनेक प्रसंगातून आपल्यातील या समाजसेवी गुणांचे दर्शन घडविले आहे.

समाजकारण आणि राजकारण यांची गुंफण जर व्यवस्थितरीत्या घातली तर जनता अशा कुटुंबावर कसे प्रेम करते, याचे उदाहरण म्हणून मनसेचे नाशिक येथील महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या कुटुंबाकडे पाहावे लागेल. राज्यातील मनसेचे प्रथम महापौर हा मान अ‍ॅड. यतीन यांनी मिळविण्याआधी या कुटुंबाकडे आलेल्या पदांचा विचार केला तर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य कळू शकेल. त्यांचे आजोबा यादवराव वाघ तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, वडील अ‍ॅड. रघुनाथ वाघ उपनगराध्यक्ष, आत्या सुमनताई बागले नाशिकच्या पहिल्या उपमहापौर, अशी अनेक पदे या कुटुंबाकडे मिळालेली आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता अ‍ॅड. यतीन यांना महापालिकेचा गाडा हाकताना कुटुंबाच्या या वारशाचा नक्कीच फायदा होऊ शकेल. वयाची पंचेचाळिशी गाठलेले यतीन यांच्या कुटुंबात आई गंगाबाई यांचा अपवाद वगळता वडील, पत्नी, भाऊ, दोन्ही बहिणी, इतकेच काय वहिनी असे सर्वच कायद्याचे पदवीधर. गंगापूर हे वाघ यांचे मूळ गाव. पेठे विद्यालयातून माध्यमिक, भि. य. क्ष. महाविद्यालयातून उच्च माध्यमिक आणि न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयातून बी.एस.एल., एलएल.बी. पूर्ण करणाऱ्या अ‍ॅड. वाघ यांना महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांचा कौल मिळाला. मागील पंचवार्षिकात महापालिकेच्या खर्चातून नगरसेवकांना मोबाइल देण्याच्या ठरावाला कडाडून विरोध करणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख झाली. पक्षकार्यात त्यांनी आपल्या वकिली कौशल्याचाही परिचय वेळोवेळी दिला आहे. मितभाषी असलेल्या अ‍ॅड. यतीन यांच्यातील हे सर्व गुणच त्यांना महापौरपदापर्यंत घेऊन गेले.

Author