लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला.
मा.लक्ष्मीकांत हे अत्यंत मृदूभाषी, लाघवी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे आडनाव कुडाळकर च्या ऐवजी “गोडबोले” शोभलं असतं असं गमतीने म्हटलं जायचं. गरीबीतून वर आले असल्याने शेवटपर्यंत त्यांचे पाय जमीनीवरच होते. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले.
१९४८ च्या “जिद्दी” पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक (मेंडोलीन आणि व्हायोलीन) तर कधी संयोजक म्हणून काम केले. “दोस्ती” चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते.
आजही हिरो मधली ती बासरी, कर्जमधली गिटारची धून, दोस्तीमधले माउथ ऑर्गनचे पीस कुठेही ऐकले तरी मान आपोआप डोलायला लागते. या इडस्ट्रीत आपल्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीत, त्यांनी ६३५ चित्रपटाना, ३५०० च्या वर गाण्याना त्यांनी संगीत दिले. व सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवली.
लक्ष्मीकांत यांचे २५ मे १९९८ रोजी निधन झाले.
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत (10-Nov-2017)
लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत (3-Nov-2021)