मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक उपेन्द्र लिमये यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९६९ रोजी झाला.
महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. पठडीबाहेरील भूमिका करण्यासाठी उपेंद्र लिमये अतिशय प्रसिद्ध आहेत.
त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटात विविध भूमिका साकारल्या.
त्यांना २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.