मराठी आणि हिंदी अशा दोन्ही रंगभूमीं, रुपेरी पडदा व मालिकांमधुन समीर धर्माधिकारींनी आपलं अनोखं स्थान निर्माण केलं असून, मराठीतला ‘चॉकलेट हिरो’ व ‘सुपरमॉडेल’ अशी ख्याती आहे. मुळचे पुण्यातील असणार्या समीर धर्माधिकारींनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून नाटकांची व कलेची लहानपणापासूनच आवड होती ; व्यावसायिक रंगभूमी तसंच चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये भुमिका साकारल्या. मुंबईत दाखल झाल्यानंतर समीर यांनी विमल सुटिग्स, डी-बीयर्स, नेस्कॅफे, आय.सी.आय.सी.आय बॅंक, रेमण्ड्स, कॉटनकिंग व गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीत काम केले असून असंख्य जाहिरातींचे प्रिंटशुट्स देखील केल्या आहेत.
समीर धर्माधिकारी
उत्तम शरीरयष्टी, देखण्या व रुबाबदार अदा यामुळे समीर धर्माधिकारी यांचं व्यक्तिमत्व नायक, खलनायक यासह सर्वच भूमिकांना शोभेल असंच आहे. निर्मला मच्छिंद्र कांबळे, दिल क्या करे, सत्ता, रेनकोट, मनोरंजन-द एंटरटेन्मेंट, अग्नीपंख, मुंबई मेरी जान, गेम, रंग रसिया, सिटी ऑफ गोल्ड अश्या हिंदी तर; रेसटॉरंट, लालबाग परळ, मॅटर, बाबुरावला पकडा, समांतर, मात अश्या मराठी चित्रपटातून समीर धर्माधीकारींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत.