राहुल नागवेकर

नागवेकर, राहुल

‘नॅशनल जिऑग्राफी बी’ हीदेखील अखेर शालेय ज्ञानस्पर्धाच, पण ती साधीसुधी नव्हे.. विजेत्याला थेट ‘नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी’चे आजीव सदस्यत्व मिळते, शिवाय कॉलेज शिक्षणासाठी २५ हजार डॉलरची शिष्यवृत्ती आणि ‘नॅट-जिओ’तर्फे गल्पागॉस बेटांवरील सफरीत सहभागी होण्याची संधी! हे सारे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शुगरलँड भागात राहणाऱ्या ऊर्मिला सबनीस-नागवेकर आणि मनोज नागवेकर यांचा सुपुत्र राहुल याने गेल्या गुरुवारी मिळवले.

राहुलची भूगोलाची आवड लहानपणापासूनचीच. चौथीत असतानापासून मला नकाशे पाहायला आवडत, असे त्याने सांगितले आहे. मात्र, त्याच्या पालकांनीदेखील कमी मेहनत घेतलेली नाही.. त्याला आवडते, म्हणून गेली सहा वर्षे याच स्पर्धेच्या टेक्सास राज्यस्तरीय फेऱ्या त्याला दाखवण्यासाठी हे आई/वडील त्याला नेत होते. त्याची तयारी व्हावी, म्हणून वडील मुद्दाम कठीण-कठीण प्रश्न काढत आणि कधी वडील, कधी आई त्याच्याकडून ते सोडवून घेत. ‘मलाही प्रश्न कठीणच वाटत, तो सोडवे’ असे ऊर्मिला सांगतात. अखेर यंदा त्याला ‘क्वेल व्हॅली मिडल स्कूल- मिसूरी’ या त्याच्या शाळेने या स्पर्धेत सहभागाची संधी दिली. टेक्सास राज्यातील १०० विद्यार्थ्यांच्या प्राथमिक फेरीतून उपान्त्य फेरीच्या १० जणांत राहुल पोहोचला, तिथे अगदी शेवटच्या दोघांतून राहुलच जिंकल्याने अखिल अमेरिकी फेरीसाठी जाणार हे पक्के झाले. या अखिल अमेरिकी फेरीत दहापैकी सात स्पर्धक दक्षिण आशियाई (बहुश: भारतीयच) वंशाचे होते! अगदी कार्तिक कर्णिक हा मूळ महाराष्ट्रीय स्पर्धकही होता. स्पर्धेत काही कारणाने ते मागे पडले, पण प्रत्येकाच्याच पालकांनी मेहनत घेतली असेल. भारताकडे होणाऱ्या प्रवासामुळे लहानपणीच भूगोलाची गोडी या मुलांना लागली असावी, असे कुणा अमेरिकी तज्ज्ञाचे म्हणणे. अखेरच्या फेरीत वंश जैन आणि राहुल नागवेकर हे दोघे होते.. तीन प्रश्नांची उत्तरे दोघांनी अचूक दिली. अखेर बव्हेरियात, डॅन्यूब नदीकाठच्या कोणत्या शहरात पवित्र रोमन राज्याच्या कायदेमंडळाचे मुख्यालय इ. स. १६६३ ते १८०६ पर्यंत होते?’ - या प्रश्नावर ‘ रेन्गेन्सबर्ग ’ असे बिनचूक उत्तर आठवीतल्या राहुलने दिले!



नागवेकर, राहुल

‘नॅशनल जिऑग्राफी बी’ हीदेखील अखेर शालेय ज्ञानस्पर्धाच, पण ती साधीसुधी नव्हे.. विजेत्याला थेट ‘नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी’चे आजीव सदस्यत्व मिळते, शिवाय कॉलेज शिक्षणासाठी २५ हजार डॉलरची शिष्यवृत्ती आणि ‘नॅट-जिओ’तर्फे गल्पागॉस बेटांवरील सफरीत सहभागी होण्याची संधी! हे सारे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शुगरलँड भागात राहणाऱ्या ऊर्मिला सबनीस-नागवेकर आणि मनोज नागवेकर यांचा सुपुत्र राहुल याने गेल्या गुरुवारी मिळवले.

राहुलची भूगोलाची आवड लहानपणापासूनचीच. चौथीत असतानापासून मला नकाशे पाहायला आवडत, असे त्याने सांगितले आहे. मात्र, त्याच्या पालकांनीदेखील कमी मेहनत घेतलेली नाही.. त्याला आवडते, म्हणून गेली सहा वर्षे याच स्पर्धेच्या टेक्सास राज्यस्तरीय फेऱ्या त्याला दाखवण्यासाठी हे आई/वडील त्याला नेत होते. त्याची तयारी व्हावी, म्हणून वडील मुद्दाम कठीण-कठीण प्रश्न काढत आणि कधी वडील, कधी आई त्याच्याकडून ते सोडवून घेत. ‘मलाही प्रश्न कठीणच वाटत, तो सोडवे’ असे ऊर्मिला सांगतात. अखेर यंदा त्याला ‘क्वेल व्हॅली मिडल स्कूल- मिसूरी’ या त्याच्या शाळेने या स्पर्धेत सहभागाची संधी दिली. टेक्सास राज्यातील १०० विद्यार्थ्यांच्या प्राथमिक फेरीतून उपान्त्य फेरीच्या १० जणांत राहुल पोहोचला, तिथे अगदी शेवटच्या दोघांतून राहुलच जिंकल्याने अखिल अमेरिकी फेरीसाठी जाणार हे पक्के झाले. या अखिल अमेरिकी फेरीत दहापैकी सात स्पर्धक दक्षिण आशियाई (बहुश: भारतीयच) वंशाचे होते! अगदी कार्तिक कर्णिक हा मूळ महाराष्ट्रीय स्पर्धकही होता. स्पर्धेत काही कारणाने ते मागे पडले, पण प्रत्येकाच्याच पालकांनी मेहनत घेतली असेल. भारताकडे होणाऱ्या प्रवासामुळे लहानपणीच भूगोलाची गोडी या मुलांना लागली असावी, असे कुणा अमेरिकी तज्ज्ञाचे म्हणणे. अखेरच्या फेरीत वंश जैन आणि राहुल नागवेकर हे दोघे होते.. तीन प्रश्नांची उत्तरे दोघांनी अचूक दिली. अखेर बव्हेरियात, डॅन्यूब नदीकाठच्या कोणत्या शहरात पवित्र रोमन राज्याच्या कायदेमंडळाचे मुख्यालय इ. स. १६६३ ते १८०६ पर्यंत होते?’ – या प्रश्नावर ‘ रेन्गेन्सबर्ग ’ असे बिनचूक उत्तर आठवीतल्या राहुलने दिले!

Author