नितीन ढेपे

नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत.

ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे यांचा जन्म १२ फेब्रुवारीला झाला.

वाडा या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला पर्यटनातून अनुभवता यावी, या उद्देशातून ढेपे वाडा वास्तू साकारण्यात आली.

नितीन ढेपे हे स्वत: वास्तुविशारद आहे. अनेक वाडय़ांच्या जागेवर अपार्टमेंटची निर्मिती केल्यानंतर सदनिकेच्या किल्ल्या लोकांना देत असताना आपण वाडा या संस्कृतीपासून दूर जात आहोत याची खंत त्यांना सतत जाणवत होती. महाराष्ट्रातील पारंपरिक वाडा संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशातून ढेपे वाडा या वास्तूची निर्मिती केली.

थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने तसेच ह्या प्रकल्पाचे वास्तुविशारद व मराठा वास्तुशेलीचे तज्ञ डॉ. अविनाश सोवनी यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आणि सर्व सहकाग्रांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक अडचणींवर मात करत ते स्वप्न पूर्ण करु शकलो.

नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत.

त्यांच्या https://www.dhepewada.com/ या संकेतस्थळाला गेल्या चार वर्षांत जगभरातून जवळपास ७५ लाख हून अधिक लोकांनी भेट दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29534 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →