गाडे, (डॉ.) वासुदेव
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वासुदेव गाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या काही दशकांत पुणे विद्यापीठाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यासाठी आजवरच्या कुलगुरूंनी केलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. गाडे यांना आता ही संधी मिळते आहे. केवळ बायोटेक्नॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांना दीर्घ अनुभव असला, तरी विद्यापीठाच्या प्रशासनाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक म्हणून सध्या ते कार्यरत होते. त्यामुळे महाविद्यालयांची अवस्था आणि दशा, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रश्न आणि त्याबाबतची कार्यवाही याची त्यांना चांगली जाण आहे. नागपूरजवळील एका खेडय़ात प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करताना डोक्यावर पुस्तके घेऊन नदी पार करण्याचे कष्ट त्यांनी उपसले होते. ज्ञानार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव असलेला हा माणूस शिक्षणासाठी दिल्लीत गेला, तेव्हा त्याचे आयुष्य सर्वार्थाने बदलले.
तरीही पाय जमिनीवरच ठेवण्यात त्यांना यश मिळाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डॉ. गाडे संयमशील व शांत स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो, लुपिन पारितोषिकाचे मानकरी, केंद्रीय विज्ञान संस्थेतील मान्यताप्राप्त वैज्ञानिक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम करत असतानाही बायोटेक्नॉलॉजीमधील नव्या आणि समाजाभिमुख संशोधनाकडे ते आवर्जून लक्ष देतात. विज्ञानातील मूलभूत संशोधनाच्या परंपरेत त्यांनी आजवरकेलेले संशोधन मान्य झाले असले, तरी ते सुरू ठेवणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा असे जे विद्यापीठांचे स्वरूप झाले आहे, त्याला छेद देऊन नवे अधिक दमदार वातावरण निर्माण करण्यासाठी डॉ. गाडे यांचा अनुभव उपयोगी पडू शकतो. सर्वाना बरोबर घेऊन विद्यापीठाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करण्यास ते उद्युक्त करतील अशा विश्वासानेच त्यांचे अभिनंदन करायला हवे.
---------------------------------------------------------------------------------------------------
डॉ. वासुदेव गाडे
डॉ. वासुदेव गाडे यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला अखेर कुलगुरू मिळाला. अभ्यासाची आणि संशोधनाची वृत्ती जोपासणाऱ्या कुलगुरूंची मोठी परंपरा या विद्यापीठाला आहे. डॉ. गाडे यांच्या नियुक्तीने ही परंपरा कायम राहिली आहे. ते उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्या-पीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणाऱ्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्या-पासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असताना घेतले. 'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्यु-त्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वषेर् संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे. दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वषेर् शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनॉ मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी आता ते विशेष प्रयत्न करणार आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इतरत्र मिळालेल्या संधींमुळे कार्यकाल पूर्ण केलेला नाही. आपण कोठेही न जाता हा कार्यकाल पूर्ण करू, असे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत विद्यापीठाचा गाडा यशस्वीपणे हाकावा, यासाठी त्यांना शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------
गाडे, (डॉ.) वासुदेव
'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. वासुदेव गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्युत्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. ही पदवी त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्षे संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे.
दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वर्षे शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३ मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदार्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनो मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले.
डॉ. वासुदेव गाडे हे उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्यापीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणार्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असतानाच घेतले.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांच्याकडे चालून आले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
गाडे, (डॉ.) वासुदेव
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वासुदेव गाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या काही दशकांत पुणे विद्यापीठाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यासाठी आजवरच्या कुलगुरूंनी केलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. गाडे यांना आता ही संधी मिळते आहे. केवळ बायोटेक्नॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांना दीर्घ अनुभव असला, तरी विद्यापीठाच्या प्रशासनाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक म्हणून सध्या ते कार्यरत होते. त्यामुळे महाविद्यालयांची अवस्था आणि दशा, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रश्न आणि त्याबाबतची कार्यवाही याची त्यांना चांगली जाण आहे. नागपूरजवळील एका खेडय़ात प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करताना डोक्यावर पुस्तके घेऊन नदी पार करण्याचे कष्ट त्यांनी उपसले होते. ज्ञानार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव असलेला हा माणूस शिक्षणासाठी दिल्लीत गेला, तेव्हा त्याचे आयुष्य सर्वार्थाने बदलले.
तरीही पाय जमिनीवरच ठेवण्यात त्यांना यश मिळाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डॉ. गाडे संयमशील व शांत स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो, लुपिन पारितोषिकाचे मानकरी, केंद्रीय विज्ञान संस्थेतील मान्यताप्राप्त वैज्ञानिक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम करत असतानाही बायोटेक्नॉलॉजीमधील नव्या आणि समाजाभिमुख संशोधनाकडे ते आवर्जून लक्ष देतात. विज्ञानातील मूलभूत संशोधनाच्या परंपरेत त्यांनी आजवरकेलेले संशोधन मान्य झाले असले, तरी ते सुरू ठेवणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा असे जे विद्यापीठांचे स्वरूप झाले आहे, त्याला छेद देऊन नवे अधिक दमदार वातावरण निर्माण करण्यासाठी डॉ. गाडे यांचा अनुभव उपयोगी पडू शकतो. सर्वाना बरोबर घेऊन विद्यापीठाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करण्यास ते उद्युक्त करतील अशा विश्वासानेच त्यांचे अभिनंदन करायला हवे.
—————————————————————————————————
डॉ. वासुदेव गाडे
डॉ. वासुदेव गाडे यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला अखेर कुलगुरू मिळाला. अभ्यासाची आणि संशोधनाची वृत्ती जोपासणाऱ्या कुलगुरूंची मोठी परंपरा या विद्यापीठाला आहे. डॉ. गाडे यांच्या नियुक्तीने ही परंपरा कायम राहिली आहे. ते उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच ‘महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा’चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्या-पीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणाऱ्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्या-पासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असताना घेतले. ‘लाइफ सायन्स’ विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्यु-त्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. त्यांनी तेथेच संपादन केली. ‘पोस्ट डॉक्टरल फेलो’ म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वषेर् संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे. दिल्ली येथील केंदाच्या ‘सीएसआयआर’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी’ प्रयोगशाळेत २० वषेर् शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. ‘सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’ (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनॉ मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी आता ते विशेष प्रयत्न करणार आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इतरत्र मिळालेल्या संधींमुळे कार्यकाल पूर्ण केलेला नाही. आपण कोठेही न जाता हा कार्यकाल पूर्ण करू, असे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत विद्यापीठाचा गाडा यशस्वीपणे हाकावा, यासाठी त्यांना शुभेच्छा.
——————————————————————————————————
गाडे, (डॉ.) वासुदेव
‘लाइफ सायन्स’ विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. वासुदेव गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्युत्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. ही पदवी त्यांनी तेथेच संपादन केली. ‘पोस्ट डॉक्टरल फेलो’ म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्षे संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे.
दिल्ली येथील केंदाच्या ‘सीएसआयआर’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी’ प्रयोगशाळेत २० वर्षे शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३ मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदार्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. ‘सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’ (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनो मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले.
डॉ. वासुदेव गाडे हे उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच ‘महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा’चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्यापीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणार्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असतानाच घेतले.