खलील शरिफ गिरकर

खलील शरिफ गिरकर हे टी. व्ही. नाईन या नामांकित वृत्तवाहिनीवर पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. राजकीय व सामाजिक घडामोडींवरील त्यांचे अफाट ज्ञान, व ते ज्ञान सर्व बाजुंनी नीट विचार करून वाचकांसमोर अथवा प्रेक्षकांसमोर मांडताना त्यांनी जोपासलेला तटस्थ व निःपक्षपातीपणा हा सर्वज्ञात आहे. गेल्या पाच वर्षांपासुन पत्रकारितेचे व्रत मोठया निष्ठेने व प्रामाणिकपणे स्वीकारलेल्या गिरकरांनी आजवर अनेक राजकीय व सामाजिक विषयांचे अचुक विश्लेषण व उत्खनन करून त्यांवर विपुल लेखन व सादरीकरण केले आहे, व लेखनिक कौशल्यांबरोबरच प्रशासकीय कामांसाठी, त्यांनी त्यांच्यामध्ये प्रयत्नपुर्वक विकसीत केलेले व्यावसायिक अंग नक्कीच स्पृहणीय असे आहे.



खलील शरिफ गिरकर हे टी. व्ही. नाईन या नामांकित वृत्तवाहिनीवर पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. राजकीय व सामाजिक घडामोडींवरील त्यांचे अफाट ज्ञान, व ते ज्ञान सर्व बाजुंनी नीट विचार करून वाचकांसमोर अथवा प्रेक्षकांसमोर मांडताना त्यांनी जोपासलेला तटस्थ व निःपक्षपातीपणा हा सर्वज्ञात आहे. गेल्या पाच वर्षांपासुन पत्रकारितेचे व्रत मोठया निष्ठेने व प्रामाणिकपणे स्वीकारलेल्या गिरकरांनी आजवर अनेक राजकीय व सामाजिक विषयांचे अचुक विश्लेषण व उत्खनन करून त्यांवर विपुल लेखन व सादरीकरण केले आहे, व लेखनिक कौशल्यांबरोबरच प्रशासकीय कामांसाठी, त्यांनी त्यांच्यामध्ये प्रयत्नपुर्वक विकसीत केलेले व्यावसायिक अंग नक्कीच स्पृहणीय असे आहे. त्यामुळे दक्ष आणि संवेदनशील पत्रकार, प्रतिभावंत व सडेतोड लेखक आणि विश्लेषक, तसेच एक हाडाचा व पारदर्शी प्रशासकीय अधिकारी अशा विवीध मुखवटयांमध्ये चपखल बसू शकणारे, व यातील प्रत्येक क्षेत्रात आपले उत्तुंग कर्तुत्व गाजवु शकणारे असे त्यांचे प्रभावी व्यकित्व आहे. त्यांचा जन्म देवगड तालुक्यातील मोंड येथे झाला.

पत्रकारितेत घुसल्यानंतर, अनेक व्यक्तींशी हितसंबंध जोडु शकणारा एक जबाबदार राजकीय विश्लेषक अशी अल्पावधीतच त्यांनी आपली ओळख निर्माण केली. माणसे जोडण्याचे व, विवीध संस्थांशी, गटांशी व संघटनांशी फलदायी ऋणानुबंध निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य अफाट असल्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. यादरम्यान समाजकारण व राजकारणातील हजारो पैलु निवडुन त्यांच्यावर, सपाटुन माहितीपर लेख लिहीण्याची प्रक्रियाही त्यांनी जोमाने सुरू केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधुन डिप्लोमा इन जर्नेलिसम व राज्यशास्त्र हा प्रमुख विषय निवडुन बी. ए. झालेले गिरकर, मराठी डेली, तसेच महाजनशक्ती अशा वृत्तपत्रांमधुन आपल्या जिव्हाळ्याच या विषयांवर नियमीत तसेच प्रासंगिक स्तंभलेखन करू लागले. या वृत्तपत्रांसाठी राजकीय व चालु घडामोडींवर लेखन करणारा करस्पॉन्डन्ट म्हणून अनेक वर्षे काम केले.

बी. ए. प्रमाणेच ते डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरींग [डॉ. जे. जे. मगदुम पॉलिटेक्निक, जयसिंगपुर] व सर्टिफिकेट कोर्स इन मिडिया इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या काही शैक्षणिक परीक्षांचे यशस्वी धारक आहेत. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या पांडुरंग फुंडकर [ त्यावेळेचे विरोधीपक्षाचे प्रमुख] यांच्या कार्यालयात पब्लिक रिलेशन ऑफिसर चे काम करत असताना त्यांचे नाव व कल्पक डावपेच खेळण्याची त्यांची वृत्ती खर्‍या अर्थाने प्रकाशात आली. त्यानंतर वकिल माजिद मेनन [ त्यावेळचे राष्ट्रीय संचालक- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी] यांच्या कार्यालयातदेखील त्यांची चमक, मेनन यांच्या राजकीय सचिव व पब्लिक रिलेशन्स इन चार्ज ची भुमिका बजावताना दिसुन आली. याचप्रमाणे ‘अस्त्र’ या मराठी साप्ताहिकासाठी राजकीय व चालु घडामोडींवरील करस्पॉन्डन्ट, मोंड ग्रामस्थ विकास मंडळाच्या कार्यकारी समितीचे माननीय सदस्य, एकता फाउंडेशनचे मुंबई परिसरातील सक्रिय सदस्य अशा कित्येक विवीधरंगी भुमिकांमध्ये हा बहुरूपी लिलया वावरला.

Author