नरेंद्र बेडेकर

काही व्यक्ती या अशा असतात ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा रुबाब हा समोरच्याला चटकन आपलसं करुन घेतो. असंच ठाण्यातलं एक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर होय.



काही व्यक्ती या अशा असतात ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा रुबाब हा समोरच्याला चटकन आपलसं करुन घेतो. असंच ठाण्यातलं एक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर होय. निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखतकार, इतिहास तज्ञ ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये.

१९८७ पासून निवेदन आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात बेडेकरांनी पदार्पण केलं तेव्हापासून त्यांनी विविध कार्यक्रमांच सूत्रसंचालन केलं. राज्य शासनाच्या सर्व प्रमुख कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. राज्यातील अनेक कलाकारांना घेऊन त्यांनी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम केले आहेत. तसंच त्यांनी अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना आजवर अ.भा.म.ना. परिषदेचा उत्कृष्ट सूत्रसंचालक, संगीतकार अनिल मोहिले पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.

Author