रुईया कॉलेजला बीएच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या ऐश्वर्याने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने डॉ.संध्या पुरेचांकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेतले. भरतनाट्यममधील विशारद ही पदवीही तिने प्राप्त केली. याबरोबरच कथ्थकचीही डिग्री मिळवली.
नृत्य म्हणजे तिचा जीव की प्राण. पण इतरांना ते शिकवायलाही तिला मनापासून आवडतं. म्हणूनच डान्स शिकता शिकता तिनं निरनिराळ्या शोज मध्ये परफॉर्म करायलाही सुरुवात केली. नुकताच सिमल्याच्या एका शाळेच्या शतकपूर्तीसाठी लहानग्यांचा डान्सही तिने बसवला होता.
'डान्स ही माझी पहिली आवड असली तरी अॅक्टींगचीही मला प्रचंड ओढ आहे' असं ऐश्वर्या म्हणते. ' राहिले दूर घर माझे ', ' देवकी ', ' हिरवं कुंकू ' अशा सिनेमांत बालकलाकार म्हणून तिनं काम केलंय. त्यासोबतच अनेक जाहिराती आणि हिंदी मराठी मालिकांमधूनही ती तिची अभिनयाची आवड जोपासत असते.
अभिनय आणि नृत्यासोबत मल्लखांब आणि जिम्नॅस्टिकचीही तिला आवड आहे. दादरच्या प्रभात पथकात मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स दोन्हीचं शिक्षण ती सध्या घेतेय. अभिनय आणि नृत्यासोबतच या क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याचा तिचा मानस आहे.
रुईया कॉलेजला बीएच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या ऐश्वर्याने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने डॉ.संध्या पुरेचांकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेतले. भरतनाट्यममधील विशारद ही पदवीही तिने प्राप्त केली. याबरोबरच कथ्थकचीही डिग्री मिळवली.
नृत्य म्हणजे तिचा जीव की प्राण. पण इतरांना ते शिकवायलाही तिला मनापासून आवडतं. म्हणूनच डान्स शिकता शिकता तिनं निरनिराळ्या शोज मध्ये परफॉर्म करायलाही सुरुवात केली. नुकताच सिमल्याच्या एका शाळेच्या शतकपूर्तीसाठी लहानग्यांचा डान्सही तिने बसवला होता.
‘डान्स ही माझी पहिली आवड असली तरी अॅक्टींगचीही मला प्रचंड ओढ आहे’ असं ऐश्वर्या म्हणते. ‘ राहिले दूर घर माझे ‘, ‘ देवकी ‘, ‘ हिरवं कुंकू ‘ अशा सिनेमांत बालकलाकार म्हणून तिनं काम केलंय. त्यासोबतच अनेक जाहिराती आणि हिंदी मराठी मालिकांमधूनही ती तिची अभिनयाची आवड जोपासत असते.