अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब.
रणजी स्पर्धा आठ वर्षे गाजवल्यानंतर १९६८ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी अजित वाडेकर यांच्यासाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे उघडले. अजित वाडेकर हे कायम तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येत व भारताच्या डावाला स्थैर्य मिळवून देत. स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती.
अजित वाडेकर यांनी आपल्या आठ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत धडाकेबाज डावखुरी फलंदाजी व कुशल नेतृत्वाने 'टीम इंडिया'ला गौरवशाली मालिका विजय मिळवून दिला. १९६८ साली नवाब टायगर पतौडीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला. यात मा.अजित वाडेकर यांची बॅट सूर्यासारखी तळपली. वाडेकरांनी ज्यात धो धो धावा कमवल्या त्यामुळे हिंदुस्थानने ती कसोटी मालिका जिंकली. परदेशी भूमीवर भारतीय संघाला जेतेपद प्राप्त करून देणारे पहिले भारतीय कर्णधार म्हणून त्यांची ख्याती होती.
अजित वाडेकर यांच्या फटक्यांचे यथार्थ वर्णन एका ब्रिटीश पत्रकाराने केले होते, Relaxed Silkiness. कसोटीतील निवृत्तीनंतर स्टेट बँकेत ज्येष्ठ अधिकारीपदावर काम करताना अजित वाडेकर यांनी निवड समिती सदस्य, अध्यक्ष व मॅनेजर अशा जबाबदाऱ्याही पार पाडल्या होत्या.
भारत सरकारने अजित वाडेकर यांना १९६७ साली अर्जुन पुरस्काराने गौरविले होते. तर १९७२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका अजित वाडेकर समरसून जगले.
क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्याविषयी अधिक माहिती देणारा संजीव वेलणकरांचा लेख
अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब.
रणजी स्पर्धा आठ वर्षे गाजवल्यानंतर १९६८ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी अजित वाडेकर यांच्यासाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे उघडले. अजित वाडेकर हे कायम तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येत व भारताच्या डावाला स्थैर्य मिळवून देत. स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती.
अजित वाडेकर यांनी आपल्या आठ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत धडाकेबाज डावखुरी फलंदाजी व कुशल नेतृत्वाने ‘टीम इंडिया’ला गौरवशाली मालिका विजय मिळवून दिला. १९६८ साली नवाब टायगर पतौडीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला. यात मा.अजित वाडेकर यांची बॅट सूर्यासारखी तळपली. वाडेकरांनी ज्यात धो धो धावा कमवल्या त्यामुळे हिंदुस्थानने ती कसोटी मालिका जिंकली. परदेशी भूमीवर भारतीय संघाला जेतेपद प्राप्त करून देणारे पहिले भारतीय कर्णधार म्हणून त्यांची ख्याती होती.