रघुनाथराव पेशवे

(१ ऑगस्ट १७३४ - ११ डिसेंबर १७८३)

उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म माहुली येथे झाला. बालपण छ. शाहूंजवळ गेले. लहानपणी हा उनाड होता. १७५३ पासून तो स्वतंत्रतेने स्वार्‍या काढू लागला. त्याची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. तीत तो दिल्लीस गेला होता. या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली, पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला. तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकडया तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या, पण हा काही कारण नसता १७५८ मध्ये पूण्यास परत आला. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साहय करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता. तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले, पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणेस स्वस्थ बसून राहिला.

(१ ऑगस्ट १७३४ – ११ डिसेंबर १७८३)

Author