उगाच काहीतरी – २७

आज सकाळची अतिशय ट्राफिकची वेळ. सिग्नल वर एक कार थांबलेली. श्रीमान ड्रायव्हिंग सिटवर आणि शेजारच्या सिटवर श्रीमती लिपस्टिक लावायला सुरवात करतात. तितक्यात सिग्नल हिरवा होतो आणि कार हळुवारपणे पुढे निघते आणि तेवढ्यात..
डाव्या बाजूचा रिक्षावाला अचानकपणे कारच्या समोरून उजव्या बाजूला वळतो. कारला करकचून ब्रेक लागतो आणि कार झटका देऊन तिथेच थांबते.
श्रीमान विंडो खाली करून रिक्षावाल्याच्या दिशेने ' अरे मा... '
तोवर रिक्षा सुसाट वेगाने पसार.
या भूतलावरील झालेल्या कुठल्याही घटनेची जाणिव नसणाऱ्या आणि आपल्याच धुंदीत असलेल्या श्रीमतीजी अतिशय खूंखारपणे श्रीमानजींकडे पाहताहेत. त्यांची लिपस्टिक ओठांच्या अर्ध्यातुन गालामार्गे पार कानापर्यंत पोहोचलेली...... आणि हे सांगायलाच नको की श्रीमानजींचा Monday panic त्याक्षणीच सुरू झाला...
-- अमोल पाटील

आज सकाळची अतिशय ट्राफिकची वेळ. सिग्नल वर एक कार थांबलेली. श्रीमान ड्रायव्हिंग सिटवर आणि शेजारच्या सिटवर श्रीमती लिपस्टिक लावायला सुरवात करतात. तितक्यात सिग्नल हिरवा होतो आणि कार हळुवारपणे पुढे निघते आणि तेवढ्यात..
डाव्या बाजूचा रिक्षावाला अचानकपणे कारच्या समोरून उजव्या बाजूला वळतो. कारला करकचून ब्रेक लागतो आणि कार झटका देऊन तिथेच थांबते.
श्रीमान विंडो खाली करून रिक्षावाल्याच्या दिशेने ‘ अरे मा… ‘
तोवर रिक्षा सुसाट वेगाने पसार.
या भूतलावरील झालेल्या कुठल्याही घटनेची जाणिव नसणाऱ्या आणि आपल्याच धुंदीत असलेल्या श्रीमतीजी अतिशय खूंखारपणे श्रीमानजींकडे पाहताहेत. त्यांची लिपस्टिक ओठांच्या अर्ध्यातुन गालामार्गे पार कानापर्यंत पोहोचलेली…… आणि हे सांगायलाच नको की श्रीमानजींचा Monday panic त्याक्षणीच सुरू झाला…
— अमोल पाटील

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →