भाटातली पहाट

पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा
मान उंच करुन
चंद्रीचा कोंबडा आरवला
खाजणाकडील काला वारा
अंगाला झोंबू लागला
त्याची पर्वा न करता
आसमंताला जाग आली
काळोखाचे कांबळे दूर सारीत
अवनी जागी झाली
कराडी कुटुंबाची वस्ती
विझल्या रॉकेलच्या बुदल्या
मातीच्या चुलीत अंगार फुलला
आणि झावळीच्या झोपडींतून
धुराचे ढग उसळले.
न बाळगलेली कराड्यांची
कलकलणारी कुत्री
रात्रभर जागल्याने
गटारात घोरत होती
रवी किरणांनी झाडांचा
आश्रय घेत घेत
जमिनीवर पाय टेकले
घोटभरच्या आणि भाकरी खाऊन
चंद्री बुगानी बाजाराकडे धाव घेतली

श्री. सुभाष गजानन दिघे
मुरुड



पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा
मान उंच करुन
चंद्रीचा कोंबडा आरवला
खाजणाकडील काला वारा
अंगाला झोंबू लागला
त्याची पर्वा न करता
आसमंताला जाग आली
काळोखाचे कांबळे दूर सारीत
अवनी जागी झाली
कराडी कुटुंबाची वस्ती
विझल्या रॉकेलच्या बुदल्या
मातीच्या चुलीत अंगार फुलला
आणि झावळीच्या झोपडींतून
धुराचे ढग उसळले.
न बाळगलेली कराड्यांची
कलकलणारी कुत्री
रात्रभर जागल्याने
गटारात घोरत होती
रवी किरणांनी झाडांचा
आश्रय घेत घेत
जमिनीवर पाय टेकले
घोटभरच्या आणि भाकरी खाऊन
चंद्री बुगानी बाजाराकडे धाव घेतली

श्री. सुभाष गजानन दिघे
मुरुड

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →