पोस्टाची खिडकी

पोस्टाची खिडकी
टपालासाठी

रेल्वे ची खिडकी
तिकिटासाठी

सिनेमाची खिडकी
हाऊसफुल्ल साठी

नाटकाची खिडकी
श्री. सौ. साठी

खिडक्याच खिडक्या
त्यांना काय तोटा

कुठे जाल तिथे पडेल
त्यांच्याशी गाठ

सापडेल का कुठे?
कल्पवृक्षाची खिडकी?

सापडलीच तर
एकच वाटते खंत

पाळी येईल तेव्हा
ती होऊ नये बंद!

-- विनायक अत्रे.



पोस्टाची खिडकी
टपालासाठी

रेल्वे ची खिडकी
तिकिटासाठी

सिनेमाची खिडकी
हाऊसफुल्ल साठी

नाटकाची खिडकी
श्री. सौ. साठी

खिडक्याच खिडक्या
त्यांना काय तोटा

कुठे जाल तिथे पडेल
त्यांच्याशी गाठ

सापडेल का कुठे?
कल्पवृक्षाची खिडकी?

सापडलीच तर
एकच वाटते खंत

पाळी येईल तेव्हा
ती होऊ नये बंद!

— विनायक अत्रे.

Author