हलकेच सख्या मी रानात

हलकेच सख्या मी रानात
चोर पावलांनी अशी येते,
वाट तुझी पाहता मी
बैचेन जराशी मग होते
येतो तू असा समोरुन
भान हरपून माझे जाते,
जवळ येता तू माझ्या
मी मोहरुन पुरती जाते.
घेता मिठीत अलवार तू
चुंबीतो तू बेसावध क्षणा,
ओठ ओठांनी अधर तू टिपता
लाज गाली येते हलकेच तेव्हा
स्पर्श तुझा बावरा मज होता
पदर गेला लाज सोडून वाऱ्यावरी,
न उरले बंधन कसले दोघांत काही
नजर खुणावे माझी अर्थ लागे तुलाही
तो श्रुंगार खुलला धुंद वेळी
सैलावली मी मोहक भावनांनी,
डोळे मिटले मी त्या श्रुंगार वेळी
एकरुप झाले दोन तन मोहकशी
साखर मिठीत मज तू घट्ट घेता
मी समर्पित झाली त्या वेळा,
तृप्त झालास तू त्या धुंद मिलनी
श्रुंगार रसात मी लाजते गंधाळून जरा
-- स्वाती ठोंबरे.


हलकेच सख्या मी रानात
चोर पावलांनी अशी येते,
वाट तुझी पाहता मी
बैचेन जराशी मग होते
येतो तू असा समोरुन
भान हरपून माझे जाते,
जवळ येता तू माझ्या
मी मोहरुन पुरती जाते.
घेता मिठीत अलवार तू
चुंबीतो तू बेसावध क्षणा,
ओठ ओठांनी अधर तू टिपता
लाज गाली येते हलकेच तेव्हा
स्पर्श तुझा बावरा मज होता
पदर गेला लाज सोडून वाऱ्यावरी,
न उरले बंधन कसले दोघांत काही
नजर खुणावे माझी अर्थ लागे तुलाही
तो श्रुंगार खुलला धुंद वेळी
सैलावली मी मोहक भावनांनी,
डोळे मिटले मी त्या श्रुंगार वेळी
एकरुप झाले दोन तन मोहकशी
साखर मिठीत मज तू घट्ट घेता
मी समर्पित झाली त्या वेळा,
तृप्त झालास तू त्या धुंद मिलनी
श्रुंगार रसात मी लाजते गंधाळून जरा
— स्वाती ठोंबरे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →