आठवणींच्या लाटांमधले
मी शिंपले जेव्हा वेचत जातो
सुखस्वप्नांचे संचित काही
जणू अलगद वेचत जातो
ओंजळीत भरून मग ते
किनाऱ्यावर जरा टेकतो
गाज सागरी ऐकत ऐकत
सांजदीवा लुकलुकतो
कुठूनसा मग वाहत येतो
धुंद ओला पश्चिमवारा
हळू हळू मग उमगत जातो
सुखस्वप्नांचा अर्थ खरा….
— आनंद
Author
Post Views: 16