मैत्र

तू , मी आणि वाफाळत्या चहाचा कप
तुझ्या ओठांवर हसू आणि नजर बेफिकर

बाहेर धुंवाधार पाऊस
आणि धावपळ करणारं शहर
माझं काही बोलणं
तुझं लक्ष मात्र कुठं दूरवर

सर आता जरा कमी होते
पाऊस शांत बरसत राहतो
शब्दांना शोधता शोधता
चहा निवत जातो

काही क्षण असेच रेंगाळतात
आठवणींना जपण्यासाठी
तुझ्यासाठी , माझ्यासाठी
आणि त्या वाफाळत्या चहासाठी...

---आनंद



तू , मी आणि वाफाळत्या चहाचा कप
तुझ्या ओठांवर हसू आणि नजर बेफिकर

बाहेर धुंवाधार पाऊस
आणि धावपळ करणारं शहर
माझं काही बोलणं
तुझं लक्ष मात्र कुठं दूरवर

सर आता जरा कमी होते
पाऊस शांत बरसत राहतो
शब्दांना शोधता शोधता
चहा निवत जातो

काही क्षण असेच रेंगाळतात
आठवणींना जपण्यासाठी
तुझ्यासाठी , माझ्यासाठी
आणि त्या वाफाळत्या चहासाठी…

—आनंद

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →