ती आणि तो
आजही तसेच आहेत
जणू काही आत्ताच त्यांचा
जन्म झाला आहे….
प्रेमाचा जन्म कधी होतो
ते कधीच कुणी
सांगू शकत नाही…
त्याच्या बाबतीतही असेच आहे
हवे ते मिळाले तर प्रेम पूर्ण होते का
का आणखी काही हवे असते……
सगळीच कोडी प्रेमाच्या
बाबतीत असतात पण
सोडवत बसावयाचे नसते…
काही सुटतात..
तर काही सुटत नाहीत
जी सुटत नाहीत कदाचित
तिथेच प्रेम सापडेल
पण शोधू नका
त्याला तसेच राहूदे…..
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 11