मी म्हणजे कोण
तिलाही तसेच वाटत होते
आणि त्यालाही
सुरवातीला चागले होते
पण कुठे काय झाले हे
समजलेच नाही
मी पणाच्या विचारात
दोघेही दोघे झाले
मग मात्र मजबुरी
म्हणून राहू लागले
प्रेम सुंदर असते
प्रेम म्हणजे प्रेम असते
हे शब्द टोचू लागले
कर्तव्य , व्यवहार करू
लागले …संसार करू लागले
अतृप्तपणे…
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 11