कधीतरी , कुठेतरी , केव्हाही
दिसतात प्रेमाचे रंग..
म्हणून नाक मुरडणारे खुप दिसतात ,
म्हणे काही काल-वेळ आहे का,
ही आपली संस्कृती आहे का,
पण त्याला आणि तिला
काहीच सोयर सुतक नसते…
तो आणि ती मस्तपणे
आपल्या विश्वात असतात,
आणि संस्कृती आणि इतर काटे
त्यांना कधीच बोचत नसतात
परंतु इतर मात्र तडफडत असतात
संस्कृती आणि वगैरे मध्ये…
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 12