एक्झिट

कधीतरी एक्झिट घायचीच ना, घेऊयात कि आरामात
आलंय कोण इथे थांबायला, जाऊयात कि आरामात
एक्सिट घ्यावी अशी कि कोणालाच कळणार नाही
थांबवायचे म्हटले तरी शोधूनही सापडणार नाही
उगाच त्रास नको कोणा,
नकोत वाया टिपे गाळाया
इथे प्रत्येकालाच कोण व्याप, सगळेच म्हणतात
उचला चला उरकूयात
कोणताही असो प्रसंग काट्यावरच सरकूयात
आज मी गेलो... उद्या तू येणारेस
रडतोस कशाला वेड्या सगळे इथूनच जाणारेत
संपला जरी डाव आपला तरी मोडत नाही खेळ
चल मी जातो आता ... माझा जात नाही इथे वेळ!!
-- वर्षा कदम.


कधीतरी एक्झिट घायचीच ना, घेऊयात कि आरामात
आलंय कोण इथे थांबायला, जाऊयात कि आरामात
एक्सिट घ्यावी अशी कि कोणालाच कळणार नाही
थांबवायचे म्हटले तरी शोधूनही सापडणार नाही
उगाच त्रास नको कोणा,
नकोत वाया टिपे गाळाया
इथे प्रत्येकालाच कोण व्याप, सगळेच म्हणतात
उचला चला उरकूयात
कोणताही असो प्रसंग काट्यावरच सरकूयात
आज मी गेलो… उद्या तू येणारेस
रडतोस कशाला वेड्या सगळे इथूनच जाणारेत
संपला जरी डाव आपला तरी मोडत नाही खेळ
चल मी जातो आता … माझा जात नाही इथे वेळ!!
— वर्षा कदम.

Author