वठलेल्या वडाला मोह

वठलेल्या वडाला मोह
आम्रतरुचा झाला आहे
काष्ठवत फांद्यांवर पर्ण
पिसारा फुलून आहे..
मनातील सारे न कळून आहे
प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे
दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे
वठलेला वड आज फकीर आहे..
न कळत्या दुःखाना वेदनेची
अस्पष्ट करुण किनार आहे
मरणाची वाट जवळ येईल कधीही
अंतरात दुःख विरजून अनामिक आहे..
आम्रतरुचा झोका मदमस्त
एकाकी वड उन्मळून आहे
मोहाच्या मिठीत अलगद
पालापाचोळा मन व्यथित आहे..
सांज गूढ सावल्यांना
क्षितिजाची आस आहे
न कळत्या मनातला मोहर
का पुन्हा एकाकी दुःखी आहे..
दूर कुठे गातो फकीर गाणे
बोल त्याचे अंतरी ठाव आहे
सगळेच अर्थ न उलगडतात
शब्दांचे खेळ काव्यांत बहरुन आहे..
मोहरल्या आम्रतरुच्या प्रेमात
वठलेला वड एकांती आहे
स्वार्थ न कसला गंधाचा तो
आम्रतरुचा मोह मन फुलून आहे..
उन्मळून पडेल वड एकाकी
सावलीत पांथस्थ न कोण आहे
वडाचे दुःख मिटून हलकेच
मोहरणाऱ्या आम्रतरुत आहे
न सोसवतो वारा बेफाम
न वादळ सोसते आहे
पर्णाचे दुःख अंतरी आल्हाद
वेगळे दुःख पाचोळ्याचे आहे..
प्रत्येक शब्दांचे अर्थ भावार्थ
वेगवेगळे वेढून काव्यांत आहे
विस्तीर्ण वडाचे दुःख एकाकी
मोहरल्या आम्रतरुत अव्यक्त आहे..
-- स्वाती ठोंबरे.


वठलेल्या वडाला मोह
आम्रतरुचा झाला आहे
काष्ठवत फांद्यांवर पर्ण
पिसारा फुलून आहे..
मनातील सारे न कळून आहे
प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे
दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे
वठलेला वड आज फकीर आहे..
न कळत्या दुःखाना वेदनेची
अस्पष्ट करुण किनार आहे
मरणाची वाट जवळ येईल कधीही
अंतरात दुःख विरजून अनामिक आहे..
आम्रतरुचा झोका मदमस्त
एकाकी वड उन्मळून आहे
मोहाच्या मिठीत अलगद
पालापाचोळा मन व्यथित आहे..
सांज गूढ सावल्यांना
क्षितिजाची आस आहे
न कळत्या मनातला मोहर
का पुन्हा एकाकी दुःखी आहे..
दूर कुठे गातो फकीर गाणे
बोल त्याचे अंतरी ठाव आहे
सगळेच अर्थ न उलगडतात
शब्दांचे खेळ काव्यांत बहरुन आहे..
मोहरल्या आम्रतरुच्या प्रेमात
वठलेला वड एकांती आहे
स्वार्थ न कसला गंधाचा तो
आम्रतरुचा मोह मन फुलून आहे..
उन्मळून पडेल वड एकाकी
सावलीत पांथस्थ न कोण आहे
वडाचे दुःख मिटून हलकेच
मोहरणाऱ्या आम्रतरुत आहे
न सोसवतो वारा बेफाम
न वादळ सोसते आहे
पर्णाचे दुःख अंतरी आल्हाद
वेगळे दुःख पाचोळ्याचे आहे..
प्रत्येक शब्दांचे अर्थ भावार्थ
वेगवेगळे वेढून काव्यांत आहे
विस्तीर्ण वडाचे दुःख एकाकी
मोहरल्या आम्रतरुत अव्यक्त आहे..
— स्वाती ठोंबरे.

Author