उतरते ऊन पुन्हा
परसातल्या दारातुनी
उजळले दीप पुन्हा
शिशिराच्या सांजेतुनी
हवेहवेसे होते कधी
समुद्रवाऱ्याचे शहारे
मागून का मिळते कधी
पहाटेचे स्वप्न गहिरे?
शोधताना चांदणे
वेचले उन्हाचे कवडसे
राहिले मग दूर मागे
दिव्यांचे बिलोरी आरसे…
—आनंद
Author
Post Views: 13